Shreya Ghoshal Kanha Song Instagarm
मनोरंजन बातम्या

Binodini : 'बिनोदिनी' चित्रपटातील 'कान्हा' या गाण्यासाठी श्रेया घोषालचा स्वरसाज

Binodini kanha song : सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या बिनोदिनी – एकती नातीर उपाख्यान या आगामी चित्रपटातील कान्हा हे गाणे श्रेया घोषालच्या आवाजात संगीतबद्ध करण्यात आले आहे.

Shruti Vilas Kadam

Binodini kanha song : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या “बिनोदिनी - एकटी नातीर उपाख्यान” या चित्रपटातील बहुप्रतिक्षित “कान्हा” या पहिल्या गाण्याचे अनावरण अहिंद्रा मंच, कोलकाता येथे एका भव्य कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमात अभिनेत्री रुक्मिणी मैत्राचा एक नेत्रदीपक कथ्थक परफॉर्मन्स दाखवण्यात आला आहे.

राम कमल मुखर्जी यांनी लिहिलेल्या गाण्याला संगीत दिग्दर्शक सौरेंद्रो-सौम्योजित यांनी संगीत दिलेले असून सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिच्या सुमधुर आवाजात हे गाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे. हे गाणे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या समृद्ध परंपरेत भरलेले आहे. राग मंझ खमाजवर आधारित, या रचनेत कथ्थकचे घटक समाविष्ट आहेत. ज्याने जुन्या काळातील भव्यता प्रकट केली आहे. मनिषा बसू, सौविक चक्रवर्ती आणि अव्यान रॉय यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे.

“हे गाणे बंगालमधील सर्वात प्रसिद्ध रंगमंच कलाकार, बिनोदिनी दासी यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आले आहे. बिनोदिनी दासी एक प्रतिष्ठित व्यक्तिरेखा आहे. जी जवळजवळ १५० वर्षांपूर्वी पुरुषप्रधान समाजाच्या विरोधात उभी होती. गाण्यात रुक्मिणी अतिशय सुंदर दिसली आहे आणि मला विश्वास आहे की माझ्या प्रेक्षकांना गणिकेच्या भूमिकेत तिचा सुंदर अभिनय नक्की आवडेल ”,असे दिग्दर्शक राम कमल मुखर्जी म्हणाले.

बिनोदिनी हा एक असा चित्रपट आहे जो स्त्रियांच्या न सांगितल्या जाणाऱ्या कथांवर प्रकाश टाकतो आणि स्वप्न पाहण्याच्या धाडसासाठी त्यांना किती किंमत मोजावी लागते यावर भाष्य करतो. देव एंटरटेनमेंट व्हेंचर्स प्रस्तुत आणि प्रमोद फिल्म्स आणि मिश्रित मोशन पिक्चर्स द्वारे संयुक्तपणे निर्मित, बिनोदिनी - एकती नातीर उपाख्यान २३ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

https://bit.ly/KanhaBinodiini

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: e-KYC ची मुदत 30 एप्रिलला संपली; 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र

HSC Result date: बारावीचा निकाल उद्या, या अधिकृत लिंकवर ऑनलाइन पाहता येणार, गुणपत्रिका डाउनलोड कशी कराल?

Maharashtra News Live Update: पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत कोरेगाव शहरात तीन शाखांचे आणि एका संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन

Riteish Deshmukh: तुळजाभवानीच्या चरणी देशमुख कुटुंब! 'राजा शिवाजी'च्या यशासाठी रितेश-जेनेलियाने देवीचे दर्शन घेतले

SCROLL FOR NEXT