Stree 2 Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Stree 2 Box Office Collection 10: श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2'ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम, 10 व्या दिवशीही केली छप्परफाड कमाई

Shraddha Kapoor - Rajkumar Rao Film: श्रद्धा कपूर, राजकुमार राव यांची मुख्य भूमिका असलेल्या 'स्त्री 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने 10 व्या दिवशी जबरदस्त कलेक्शन केले आहे.

Manasvi Choudhary

श्रद्धा कपूर, राजकुमार राव यांची मुख्य भूमिका असलेल्या 'स्त्री 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. कॉमेडी हॉरर 'स्त्री 2' चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. १५ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई करत नवा विक्रम केला आहे.

'स्त्री 2' हा चित्रपट 2024 मधला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. अमर कौशिक यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव अभिनीत चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन 10 दिवस झाले कमाईच्या बाबतीत अग्रेसर ठरत आहे.

'स्त्री 2'चा पहिला विकेंड धमाकेदार होता. पहिल्याच वीकेंडलाच चित्रपटाने 300 कोटींची केली. आता चित्रपटाचा दुसरा वीकेंड सुरू झाला असून दुसऱ्या शनिवारी चित्रपटाच्या कमाईने उच्चांक गाठला आहे. चित्रपटाने 10 व्या दिवशी जबरदस्त कलेक्शन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आता 10 व्या दिवशी म्हणजेच शनिवारी, 'स्त्री 2' ने 32.5 कोटींची कमाई करत 350 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हा चित्रपट केवळ देशातच नाही तर परदेशातही धुमाकूळ घालत आहे. स्त्री 2 चित्रपटाची एकूण कमाई 456 कोटींवर गेली आहे.

'स्त्री 2' हा चित्रपट हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री'चा सिक्वेल आहे. या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांना प्रंचड आवडला होता. स्त्री 2 मध्ये श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या महत्वाचा भूमिका आहेत. हा चित्रपट वर्षभरातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आता स्त्री 2 लवकरच बॉक्स ऑफिसवर 500 कोटींची कमाई करेल यात काही शंकाच नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT