Deepika Kakkar And Shoaib Ibrahim New Baby: ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्करने नुकतंच चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. दीपिका आणि शोएबला नुकतंच काही दिवसांपूर्वी पुत्ररत्न प्राप्त झालंय. दोघांनीही ही गोड बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. सध्या दीपिका आणि शोएबचं बाळ चार दिवसांपासून रुग्णालयात आहे. नुकतंच शोएबने माध्यमांशी संवाद साधताना बाळाच्या व दीपिकाच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.
‘ससुराल सिमर का’ फेम दीपिका आणि शोएब हे खऱ्या आयुष्यातही पती-पत्नी आहेत. अभिनयाबरोबरच या दोघांचं युट्यूब चॅनल देखील असून ती जोडी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. दीपिका- शोएबला मुलगा झाला असून त्याने ती गुड न्यूज सोशल मीडियाद्वारे दिली होती.
एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत शोएब इब्राहिम म्हणतो, “तुम्हाला सर्वांना माहित आहे की, दीपिका आणि मी आई-बाबा झालो आहोत. आम्हाला मुलगा झाला आहे. पण सध्या मी जास्त काही बोलू इच्छित नाही. बाळ प्रिमॅच्युअर असून ते इनक्यूबेटरमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी माझ्या लहान बाळासाठी प्रार्थना करावी, अशी माझी इच्छा आहे. इंशाल्लाह जेव्हा आमचं बाळ जेव्हा ठिक होईल त्यावेळी मी तुमच्या सर्वांसोबत नक्कीच संवाद साधेल.”
सोबतच आजच शोएबने इंस्टाग्राम स्टोरीवर पत्नी दीपिकाचा एक फोटो शेअर केला आहे, फोटोमध्ये दीपिका रुग्णालयात असल्याचं दिसत असून दीपिका आता ठिक आहे, असं कॅप्शन शोएबने या फोटोला दिलं आहे.
अभिनय क्षेत्राला रामराम करणार असल्याची घोषणा नुकतंच एका मुलाखतीत दीपिकाने (Dipika Kakar) केली होती. आईपणाचा संपूर्ण काळ आनंदात घालवणार असल्याचंही ती म्हणाली होती. दीपिकाच्या या घोषणेने चाहत्यांना मात्र धक्काच बसला होता.
दीपिकाने २० जूनला पती शोएबचा वाढदिवस साजरा केला होता. त्याच्यासाठी खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून शुभेच्छा दिल्या होत्या. शोएबनेही आयुष्याच्या नव्या टप्प्यात पाऊल टाकत आहे, अशी इमोशनल पोस्ट शेअर केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.