Akash Shloka Blessed Baby Girl Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akash Shloka Ambani Blessed Baby Girl: अंबानींच्या घरात लक्ष्मी आली, मुकेश अंबानी पुन्हा आजोबा झाले

Shloka-Akash Ambani: अंबानींच्या घरात लक्ष्मी आली, मुकेश अंबानी पुन्हा आजोबा झाले

Satish Kengar

Akash Shloka Ambani Blessed Baby Girl: अंबानी कुटुंबियांच्या घरात आज मोठं उत्सवाचं वातावरण आहे. त्याच कारण ही तसंच आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. आकाश अंबानी  (Akash Ambani) आणि त्यांची पत्नी श्लोका मेहता दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत. श्लोकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

दुसऱ्यांदा आई झाली श्लोका मेहता

आकाश अंबानीची पत्नी श्लोका हिने आज म्हणजेच 31 मे रोजी एका मुलीला जन्म दिला. सेलिब्रिटी फोटोग्राफर योगेन शाहने आपल्या इन्स्टाग्रामवर ही माहिती शेअर केली आहे. मात्र आतापर्यंत अंबानी कुटुंबियांकडून याबाबत कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नाही.  (Latest Marathi News)

2020 मध्ये मुलगा पृथ्वीला दिला होता जन्म

वर्ष 2020 मध्ये आकाश आणि श्लोका पहिल्यांदा आई-वडील झाले. 2020 मध्ये 10 डिसेंबर रोजी मुकेश अंबानींच्या घरी पृथ्वीचा जन्म झाला. नातवाच्या जन्मानंतर लगेचच मुकेश अंबानी यांनी एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये ते त्यांच्या नातवाला खुशीत घेऊन बसलेले दिसत होते.

यावेळीही असाच फोटो शेअर केला जाऊ शकतो, असं बोललं जात आहे. अंबानी कुटुंब लवकरच त्याची माहिती सोशल मीडियावर शेअर करू शकते.  (Mukesh Ambani Latest News)

आकाश आणि श्लोका 4 वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकले

दरम्यान, 9 मार्च 2019 रोजी आकाश आणि श्लोका मेहता यांचे लग्न थाटात पार पडले. आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या लग्नाला बॉलिवूडपासून देशातील आणि जगातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gold Rate : लक्ष्मीपूजनाला सोन्याची दिवाळी, तब्बल 3 हजार 300 रुपयांनी महागलं, वाचा आजचे दर

Jalna Police : दारूची अवैध तस्करी; जालना पोलिसांची कारवाई, आठ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

Box Office Collection: कांताराची दिवाळीत बंपर कमाई; लवकरच पार करणार ६०० कोटींचा टप्पा

Sachin Pilgaonkar : महागुरू सचिनचा नवा दावा, माझं गाणं 'त्यांनी' ऐकलं अन् अखेरचा श्वास घेतला

SCROLL FOR NEXT