Big Boss Reality Show 16 Saam Tv
मनोरंजन बातम्या

'हा' बॉलिवूड अभिनेता 'बिग बॉस १६' मध्ये करणार धमाकेदार एन्ट्री!

'बिग बॉस १६' साठी मेकर्स स्टार्सकडे जात आहेत. यूट्यूबर आशिष चंचलानी, अर्जुन बिजलानी, दिव्यांका त्रिपाठी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींना निर्मात्यांनी सीझन १६ साठी संपर्क साधला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस'(Big Boss) मधून सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा नव्या स्पर्धकांसह टीव्हीवर दिसणार आहे. या शोसाठी निर्मात्यांनी आतापर्यंत अनेक टीव्ही स्टार्सशी संपर्क साधला आहे. पण यावेळी टीव्ही स्टार्ससोबत एका फिल्म स्टारचे नावही समोर येत आहे. जो यावेळी बिग बॉसच्या घरात तग धरू शकतो. हा बॉलिवूड स्टार दुसरा कोणी नसून शायनी आहुजा (Shiney Ahuja) आहे. यावेळी शायनी आहुजा बिग बॉसच्या या खेळत सहभागी होऊ शकतो.

कलर्स टीव्हीवर प्रसारित होणार्‍या 'बिग बॉस १६' या बहुचर्चित रिअॅलिटी शोसाठी निर्माते स्टार्सशी संपर्क साधत आहेत. अलीकडेच असे वृत्त आले होते की यूट्यूबर आशिष चंचलानी, अर्जुन बिजलानी, सनाया इराणी आणि दिव्यांका त्रिपाठी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींना बिग बॉसच्या निर्मात्यांनी सीझन १६ साठी विचारले आहे. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. एका वृत्तानुसार, यावेळी शायनी आहुजा बिग बॉस १६ च्या घरात आपली दमदार एन्ट्री करू शकतो.

सध्या शायनी आहुजा आणि 'बिग बॉस १६' चे निर्माते यांच्यात चर्चा सुरू आहे. जर सर्व काही ठीक झाले तर शायनी आहुजा 'बिग बॉस १६' मध्ये दिसणार आहे. मात्र, आतापर्यंत बिग बॉसचे निर्माते किंवा शायनीने कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

शायनी आहुजाने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली होती. शायनीने टीव्हीच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्याने भूलभुलैया, गँगस्टर, लम्हे आणि वेलकम बॅक यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

शोचा संभाव्य स्पर्धक म्हणून या शायनीचे नाव प्रत्येक सीझनमध्ये समोर आले आहे. परंतु, तो आजपर्यंत या शोचा भाग बनला नाही. बऱ्याच दिवसांपासून तो कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नव्या विहिरीसाठी सरकार देतंय ४ लाखांचं अनुदान, दुरुस्तीसाठी मिळतंय अर्थसहाय्य, कुठे कराल अर्ज?

Maharashtra News Live Update: बॅलेट पेपरवर निवडणूका व्हाव्यात ही मागणी - राज ठाकरे

Virtual Metro Smart Card : स्मार्टफोनच बनणार तुमचं मेट्रो कार्ड, खिशात कार्ड नसतानाही करा क्यूआर कोडद्वारे प्रवास; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Badlapur Video : बदलापूर स्कायवॉकवर जोडप्याचा 39 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल, महिलेला कोण मारहाण करतंय?

BJP Setback : भाजपची डोकेदुखी वाढली! माजी आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, थेट पक्षावर काढला राग

SCROLL FOR NEXT