Shilpa Shetty Mahagauri Puja  Saam TV
मनोरंजन बातम्या

Shilpa Shetty Kanya Pujan: महाष्टमीला शिल्पा शेट्टीनं केलं कन्या पूजन, राज कु्ंद्राने मुलगी समीशाचे पाय धूवून घेतले आशीर्वाद

Shilpa Shetty Post: अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नवरात्रीनिमित्त कन्या पूजन केले आहे.

Pooja Dange

Shilpa Shetty Movie:

देशभरात नवरात्री उत्सहात साजरी होत असल्याची पाहायला मिळत आहे. या उत्साहात सेलिब्रिटी देखील सहभागी होताना दिसत आहेत. अनेक बॉलिवूड कलाकार दुर्गा पूजेत सहभागी झाले असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले जाते.

दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या घरी नवरात्रीनिमित्त पूजा केली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत शिल्पाने या पूजेचे महत्त्व देखील सांगितले आहे. तिचा नवरा राज कुंद्रा देखील तिच्यासोबत पूजा करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टीच्या देवघराची झलक देखील पाहायला मिळत आहे. शिल्पाने नवरात्रीनिमित्त घरात घटाची देखील स्थापना केलीआहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिल्पा शेट्टीने शेअर केलेला व्हिडीओ

शिल्पा शेट्टीने नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी पूजा करतानाच व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा त्यांच्या मुलीचे पूजन करताना दिसत आहेत. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी लेकीचे पाय धुतले. तिच्या पायांना हळद-कुंकू वाहिले. तिच्या केसात गजरा मळला. त्यांनतर तिची आरती केली. एखाद्या देवीला जस पुजावं तसं पूजन शिल्पा शेट्टीने केलं आहे. त्याच्यासह शिल्पाने तिच्या मुलाची देखील ओवाळले.

'॥ जय माता दी ॥ अष्टमीच्या शुभमुहूर्तावर आज आम्ही आमच्या घरी आमच्या घरची देवी समीशाचे कन्या पूजन केले आहे. आज आम्ही देवी महागौरी आणि तिच्या नऊ रूपांची भक्तिभावाने पूजा केली आहे.' असे कॅप्शन शिल्पा शेट्टीने तिच्या या व्हिडीओला दिले आहे.

शिल्पा शेट्टीने व्हिडीओ शेअर करतायच नेटकऱ्यांनी त्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. शिल्पा प्रत्येक सण खूप पारंपरिक पद्धतीने साजरा करते यासाठी नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे. तसेच तिला अष्टमीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे कुटुंबीय सध्या चर्चेत आहे. शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राने त्याचा चेहरा लोकांना दाखविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या अनेक गोष्टी हळूहळू समोर येऊ लागल्या आहेत.

शिल्पा शेट्टीच्या वर्कफ्रंटव्हिषयी बोलायचे झाले तर, ती सध्या 'इंडियाज गॉट टॅलेंट'चे परीक्षण करत आहे. तसेच शिल्पा शेट्टी रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलीस फोर्स'च्या या वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. ही वेबसीरीज १९ जानेवारीला अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

राज कुंद्रा जेलमधील दिवसांवर आधारित चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'UT ६९' असे या चित्रपटाचे नाव असून चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

SCROLL FOR NEXT