Raj Kundra Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raj Kundra News: झिरो ते हिरो! राज कुंद्राचा टॅक्सी ड्रायव्हर ते सेलिब्रिटीपर्यंतचा प्रेयणादायी प्रवास

Raj Kundra: राज अभिनय क्षेत्रात येण्याआधी काय करायचा? हे एका व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केले आहे.

Chetan Bodke

Raj Kundra Was Taxi Driver Shares Story

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा त्याच्या आगामी चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. राज कुंद्राचा ‘UT ६९’ हा आगामी चित्रपट येत्या ३ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा राज कुंद्राच्या आर्थर रोड जेलमधील अनुभवावर आधारित आहे. सध्या राज कुंद्रा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी राजच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यावेळी राज कुंद्राने त्याच्या आयुष्यातील अनेक किस्से माध्यमांसोबत शेअर केले होते. यावेळी तो भावूकही झाला होता. सध्या अभिनेत्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमध्ये राज अभिनय क्षेत्रात येण्याआधी काय करायचा? हे व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'UT-69' च्या प्रमोशन दरम्यान, राज कुंद्राने तो पूर्वी टॅक्सी ड्रायव्हर होता, तो लंडनमध्ये टॅक्सी चालवायचा, असं एका व्हिडीओमध्ये म्हणाला आहे. सध्या त्याचा प्रमोशन दरम्यानचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. राज एका कारमध्ये बसलेला दिसतोय. तो म्हणतो, “सर, कुठे जायचं आहे तुम्हाला? लाजपत नगर, मी घेऊन जातो... असा माझा प्रवास सुरू झाला होता. वयाच्या १८व्या वर्षापासून मी टॅक्सी चालवायचो, तीही लंडनमध्ये. आणि आज मी चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त टॅक्सीमध्ये बसलोय. टॅक्सीवर माझं पोस्टर पाहून मला खूप आनंद वाटतोय.” (Bollywood Film)

राजचा हा प्रमोशनल व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याच्या कामाची प्रशंसा केली आहे, तर अनेकांनी त्याला ट्रोल सुद्धा केले आहे. राज कुंद्राच्या या व्हिडीओवर चाहत्यांडून संमिश्र प्रतिसाद मिळतोय. कमेंट करताना एक व्यक्ती म्हणतो, ‘एखाद्याला ट्रोल करणे सोपे आहे, पण त्यामागे त्याचा संघर्ष काय आहे हे कोणालाच माहीत नाही.’ (Trolled)

तर आणखी एक जण म्हणतो, ‘अशी ही पहिली व्यक्ती असेल जो स्वत: केलेल्या कारस्थानामुळे इतका फेमस होतोय.’ तर अनेकांनी त्याची खिल्ली सुद्धा उडवली. राज कुंद्राचा ‘UT ६९’ हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटामध्ये राज कुंद्राच प्रमुख भूमिकेत असून चित्रपटाची कथा सुद्धा त्यानेच लिहिली आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT