RaJ Kundra Case : शर्लिन चोपडा चौकशीसाठी दाखल  Saam tv
मनोरंजन बातम्या

RaJ Kundra Case : शर्लिन चोपडा चौकशीसाठी दाखल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पॉर्न फिल्म प्रकरणी (Porn Film Case) मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता पथकाने बॉलीवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राडाला (Sharlin Chopda) चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकरणी उद्योगपती राज कुंद्राला (Raj Kundra) १९ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. शर्लिन चोप्राने राजवर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. एप्रिल महिन्यात तिने राज कुंद्राविरोधात एफआयआर दाखल केला होती. (Sherlyn Chopra has reached the Mumbai Crime Branch's property cell for interrogation)

पॉर्न फिल्म प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक खळबळजनक खुलासे झाले आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने शर्लिन चोपडाच्या कनेक्शनच्या चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. शर्लिनने प्रसारमाध्यमांमध्ये एक व्हिडिओ जारी करून म्हटले आहे की, ती मार्च महिन्यात क्राइम ब्रँचला निवेदन देण्यासाठी पहिल्यांदा गेली होती. या प्रकरणाचा तपास फेब्रुवारी 2021 पासून सुरू आहे. शर्लिनने एप्रिलमध्ये राज कुंद्राविरोधात एफआयआरही दाखल केला आहे. शर्लिनने राज कुंद्रावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या क्राईम सेलने अभिनेत्री शर्लिन शर्लिन चोपडाला बोलावून आज तिला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणात तपासादरम्यान पोलिसांना अनेक महत्त्वाचे पुरावेही मिळत आहेत. विशेष म्हणजे याप्रकरणी सर्वात आधी शर्लिननेच आपला जबाब नोंदवल्याचे म्हटले आहे. दरम्यान शर्लिनने काही दिवसांपुर्वी अटकपुर्व जमीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळून लावला. शर्लिन चोपडाने राज कुंद्रावर अनेक गंभीर आरोप केले होते.

''राज कुंद्रानेच आपल्याला अडल्ट इंडस्ट्रीमध्ये आणले, यासाठी तिला प्रत्येक प्रोजक्टच्या मागे ३० लाख रुपये दिले जात होते. मात्र करारात ठरल्याप्रमाणे तिला पैसे मिळत नसल्याने तिने एक वर्षानंतर हा प्रोजेक्ट सोडण्याचा निर्णय घेतल्याचे ती सांगते. इतकेच नव्हे तर राज कुंद्राने तिला त्याच्या अडल्ट फिल्म मध्ये काम करण्याची ऑफर देखील दिली होती. मात्र तिने यात काम करण्याला साफ नकार दिला होता.''

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

VIDEO : विधानसभेच्या तोंडावर थोरातांना मोठा धक्का !

Maharashtra News Live Updates: तुळजापूर बोगस मतदान नोंदणी अर्ज प्रकरणाला राजकीय वळण

Shirdi Saibaba : साई चरणी ६८ ग्रॅम वजनाचा सोन्याचा ब्रोच अर्पण

SCROLL FOR NEXT