Kapil Sharma On Shehnaaz Gill Show Instagram/ @shehnaazgill
मनोरंजन बातम्या

Shehnaaz Gill: नम्र असणारी शहनाज उद्धट झाली, फोटो काढणाऱ्या पत्रकारांची इज्जत काढली

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल नेहमीच फॅशनमध्ये चर्चेत असते, पण यावेळी ती तिच्या एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आली आहे.

Chetan Bodke

Kapil Sharma On Shehnaaz Gill Show: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल नेहमीच फॅशनमध्ये चर्चेत असते, पण यावेळी ती तिच्या एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आली आहे. बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतलेल्या या अभिनेत्रीचा येत्या दिवसांत बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत चित्रपट येतो आहे. सध्या ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये शहनाज गिलनं चक्क पत्रकारांवर तिने काही कमेंट केली आहे. त्या कमेंटमुळे सध्या ती बरीच चर्चेत आले आहे. सोबतच ती मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहनाज एका वेगळ्याच झोनमध्ये आहे. बिग बॉसपासून सतत चर्चेत असणाऱ्या शहनाज गिलला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे.

कपिल शर्मा त्याच्या 'झिग्वाटो' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शहनाजच्या शो मध्ये गेला होता. त्यावेळी शहनाजनं तिथं असलेल्या मीडियावर संताप व्यक्त केला आहे. त्यांच्यावर एकेरी प्रतिक्रिया देत तिनं नेटकऱ्यांची नाराजी स्वत:वर ओढावून घेतली आहे. आता तिला मोठ्या प्रमाणावर नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. बिग बॉसच्या १४ व्या सीझनमधील महत्वाची सेलिब्रेटी म्हणून शहनाज चर्चेत राहिली. ती आता बॉलिवूडमध्ये लवकरच डेब्यु करते.

फोटोग्राफर्सला पोझ देण्यासाठी आलेल्या शहनाजनं पत्रकारांचा आग्रह पाहून त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. एकदा ते ऐकल्यावर मीडियाच्या लोकांनी नमते घेतलेही. मात्र शहनाजचा राग काही कमी होईना. तिनं दोनवेळा मीडियाच्या फोटोग्राफर्सला बाहेर जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आता ती सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni: 'परमसुंदरी' अप्सरा सोनाली कुलकर्णीचा नवा लूक, पाहून मन होईल घायाळ

Maharashtra Live News Update: Parbhani: बस आणि पिकअपचा भीषण अपघात, बस झाली पलटी, सुदैवाने जीवितहानी नाही

karishma kapoor Children: करिश्मा कपूरच्या घरातील वाद चव्हाट्यावर; ३००० कोटींच्या वादात संजय कपूरच्या बहीणीची एन्ट्री

Torna Fort History: ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध, भव्य वास्तुकला आणि नैसर्गिक आकर्षण, तोरणा किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Tharala Tar Mag : सायलीच्या आयुष्यात पुन्हा येणार 'प्रिया' नावाचे वादळ, मालिकेत पुढे काय घडणार? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT