सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाजचा भावुक करणारा व्हिडीओ व्हायरल Saam Tv
मनोरंजन बातम्या

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाजचा भावुक करणारा व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ पाहून सिद्धार्थच्या चाहत्यांना अश्रू अनावर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - सिद्धार्थ शुक्लाच्या Siddharth Shukla मृत्यूने संपूर्ण देश हादरला आहे. सिद्धार्थचे चाहते आणि कुटुंबीय आतापर्यंत या धक्क्यातून सावरले नाही. तर सिद्धार्थवर खूप प्रेम करणारी शेहनाज गिलसुद्धा या दुःखातून सावरली नाही. शेहनाज गिल shehnaaz gill एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शेहनाज एक गाणं गात असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडीओ Video पाहून सिद्धार्थच्या चाहत्यांना अश्रू अनावर होत आहेत.

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाज गिलचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शेहनाज एक पंजाबी गाणे punjabi Song गात असल्याचे दिसून येत आहे. 'रोई ना जे याद मेरी... असे या गाण्याचे बोल आहेत. हे प्रसिद्ध पंजाबी गाणं आहे. सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाज गिल यांनी बिग बॉस १३ मध्ये एकत्र सहभाग घेतला होता आणि या घरामध्येच या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. सिद्धार्थच्या अश्या जाण्याने अशा शेहनाजला जबरदस्त धक्का बसला आहे. तिला अजून देखील सिद्धार्थ आपल्यातून निघून गेला या गोष्टीवर विश्वास बसत नाही आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हरभजन सिंह यांच्यासह ७ खासदार भाजपात जाणार, वाचा लिस्ट

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

Cholesterol medicine: कोलेस्ट्रॉलची औषधं मध्येच थांबवली तर काय होतं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT