Shefali Jariwala dies at age of 42 social media
मनोरंजन बातम्या

Shefali jariwala : बिग बॉस १३ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं ४२ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Bigg Boss 13 Fame Shefali Jariwala kaanta laga Actress passes away: काँटा लगा गर्ल आणि बिग बॉस १३ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं निधन झाल्याचं वृत्त आहे. ती ४२ वर्षांची होती.

Nandkumar Joshi

Shefali jariwala dies: बिग बॉस १३ फेम आणि काँटा लगा गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं ४२ व्या वर्षी निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्यानं तिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत तिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

बिग बॉस १३ ची स्पर्धक आणि काँटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिच्या निधनानं फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. रिपोर्ट्सनुसार, २७ जून रोजी रात्री शेफालीच्या छातीत अचानक दुखू लागलं. तिचा पती पराग त्यागी आणि अन्य जवळच्या तीन जणांनी तिला तात्काळ मुंबईतील अंधेरी परिसरातील एका रुग्णालयात नेलं. तिथं डॉक्टरांनी तपासणी केली असता मृत घोषित करण्यात आलं.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रुग्णालयातील स्टाफनं या दुःखद वृत्ताला दुजोरा दिला आहे. शेफाली जरीवालाच्या निधनानं तिचे चाहते आणि मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर तिच्या आठवणींना उजाळा दिला जात असून, चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

शेफाली जरीवालाचं निधन, अली गोनी यानं सोशल मीडिया पोस्टद्वारे वाहिली श्रद्धांजली

सेलिब्रिटींकडून श्रद्धांजली

अली गोनी, राजीव अदातिया आणि अन्य सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. अली गोनी यानं पोस्टद्वारे शेफालीला श्रद्धांजली वाहिली आहे. राजीव अदातिया यानंही श्रद्धांजली वाहिली आहे. ही घटना खूपच धक्कादायक आहे, अत्यंत दुःखद अशी प्रतिक्रिया त्यानं दिली आहे.

'काँटा लगा'द्वारे चमकली होती शेफाली

शेफाली जरीवाला २००२ मध्ये आलेल्या सुपरहिट काँटा लगा या गाण्याच्या माध्यमातून रातोरात स्टार झाली होती. त्यानंतर तिनं मुझसे शादी करोगी यांसारखे चित्रपट आणि अनेक म्युझिक अल्बममधून काम केलं आहे. टीव्हीवर नच बलिए ५ आणि बिग बॉस ३ यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Girls Education: उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा २ हजार! लगेचच जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती

Vice President Election: सीपी राधाकृष्णन भारताचे १७ वे उपराष्ट्रपती, इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी पराभूत

Asia Cup 2025 : संजू सॅमसनचं काय होणार? कॅप्टन सूर्यकुमार यादवने दिलं कडक उत्तर, अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन

Maharashtra Live News Update: सी.पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती

धार्मिकस्थळी नेत मोठ्या भावाकडून ३ वर्षीय बहिणीवर बलात्कार; घटना सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT