Kaanta Laga Girl Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shefali Jariwala Death : 'काटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाने घेतला जगाचा निरोप; अकाली मृत्यूमागचं गूढ काय? पाहा व्हिडिओ

Shefali Jariwala Death : काटा लगा हे गाणं ऐकल्यावर प्रथमदर्शनी जी आठवते ती शेफाली जरीवाला आज इहलोकाच्या प्रवासाला निघून गेली. कालपर्यंत धडधाकट असणाऱ्या या हरहून्नरी अभिनेत्रीचं अकाली निधन हे गूढ वाढवणारये. काय घडलं नेमकं शेफालीसोबत

Snehil Shivaji

काटां लगा.. म्हटलं की जी डोळ्यासमोर उभी राहते ती शेफाली जरीवाला. याच ‘कांटा लगा गर्ल’नं शुक्रवारी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. प्रथमदर्शनी शेफालीचा मृत्यू हा कार्डियाक अरेस्टनं झाल्याचं सांगण्यात आलंय. मात्र अवघ्या ४२ व्या वर्षी या तरुण अभिनेत्रीच्या अकाली मृत्यूनं अनेक प्रश्न उपस्थित झालेत. त्यामुळे शुक्रवारी रात्री नेमकं काय घडलं पाहूयात..

शेफालीच्या मृत्यूचं गूढ

शुक्रवारी रात्री 10.30 वाजता अंधेरीतील गोल्डन रेंज इमारतीतून काळ्या काचांची कार भरधाव वेगात बाहेर

थोड्याच वेळाच बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बेशुद्धावस्थेत शेफाली दाखल

11.30 वाजता बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी शेफालीला केलं मृत घोषित

रात्री 1 वाजता मृतदेह तातडीनं शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला

शेफालीच्या अंधेरीतील घराबाहेर पोलिस दाखल

छातीत कळा येऊ लागल्याने तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण दवाखान्यात जाईपर्यंत तिने अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यानंतर शेफालीच्या मृत्यूच गूढ वाढलंय. पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं एँक्शनमोडमध्ये येत कारवाई केलीये.

शनिवारी सकाळी पोलिस आणि फॉरेन्सिंक टिमकडून शेफालीच्या घराची तपासणी करण्यात आली यावेळी तिचा पती पराग त्यागी आणि इतर 6 जणांचे जबाब नोंदवण्यात आले तसंच शेफालीच्या घरातील मोलकरीण आणि स्वयंपाकीची आंबोली पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kabutarkhana : कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; सुप्रीम कोर्टाचे आदेश

Maharashtra Live News Update: भरधाव कार कावड यात्रेत घुसली दोन जणांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी

Drooling During Sleep : झोपेत लाळ गळते? जाणून घ्या कोणता ग्रह आहे कमजोर आणि त्याचे उपाय

Uddhav Thackeray: सरकारने स्वत:च्या हाताने लोकशाहीला काळीमा फासला; उद्धव ठाकरे कडाडले

लाडकी बहीण योजनेच्या पैशातून सुरू केला बिझनेस; एकनाथ शिंदेंही इम्प्रेस; किती होते कमाई?

SCROLL FOR NEXT