Shatir Marathi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shatir: आजच्या तरुणाईची कथा सांगणारा; 'शातिर The Beginning' हा मराठी चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Shatir Marathi Movie: 'शांतिर The Beginning या मराठी चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. सस्पेन्स थ्रीलर 'शांतिर The Beginning ' आजच्या तरुणाईची कथा सांगणारा असल्याचे टीजर मधून दिसते.

Shruti Vilas Kadam

Shatir Marathi Movie: करायला अट्टल गुन्हेगारांची "खातीर"...  घेऊन आलो आहोत, जबरदस्त शातीर...!!! अशा हटके टॅग लाईनमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या 'शांतिर The Beginning या मराठी चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. संवेदनशील विषयावर बेतलेला, सस्पेन्स थ्रीलर 'शांतिर The Beginning ' आजच्या तरुणाईची कथा सांगणारा असल्याचे टीजर मधून दिसते. हा चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

शातिर The Beginning या चित्रपटाची निर्मिती श्रीयांश आर्ट्स अँड मोशन पिक्चर्स या बॅनरखाली रेश्मा वायकर यांनी केली असून या चित्रपटाद्वारे सुनील सुशीला दशरथ वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. शातिर The Beginning च्या टीजर वरून  दिसते की हा आजच्या तरुणाईची कथा सांगणारा चित्रपट असून कॉलेज तरुणाई मध्ये वाढत असलेल्या अंमली पदार्थाच्या व्यसनांवर भाष्य करणारा असल्याचे दिसतो. पोलिसांवर हल्ला करून पसार झालेला ड्रग्ज माफिया कोण ?  पोलिस  या ड्रग्ज माफिया चा शोध घेण्यात यशस्वी ठरणार का? आणि नायिकेची या सर्व प्रकरणात  भूमिका नेमकी काय? हे जाणून घेण्याची उत्कंठा शातिर The Beginning  चा टीजर वाढवतो. 

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक सुनील वायकर म्हणाले, शांतिर The Beginning माझा दिग्दर्शक म्हणुन पाहिलाच प्रयत्न आहे. समाजातील अंमली  पदार्थाच्या सेवनामुळे होणारी व्यसनाधीनता आणि त्यामुळे वाढणारी गुन्हेगारी त्या विरुद्धचा कॉलेज मधील विद्यार्थ्यांचा लढा या चित्रपटातून दाखवून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

या चित्रपटात रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून त्यांच्यासह योगेश सोमण, रमेश परदेशी,मीर सरवर, अनिल नगरकर, अभिमन्यू वायकर, वेद भालशंकर, अॅड. रामेश्वर गिते, गौरव रोकडे, निशांत सिंग, मनोज चौधरी यांच्या महत्वपूर्ण भूमिका शातिर The Beginning  मध्ये आहेत.  येत्या २३ मे २०२५ रोजी शातिर The Beginning हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT