Kinshuk Vaidya  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

Kinshuk Vaidya Wedding : नुकताच 'शाका लाका बूम बूम' फेम संजू बोहल्यावर चढला आहे. त्याच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र लगीनसराईचे वारे वाहू लागले आहेत. मनोरंजन सृष्टीतील कलाकारांच्या लग्नाची धावपळ पाहायला मिळत आहे. काही जण हळदीचे, काही मेहंदीचे तर काही केळवणाचे फोटो सोशल मीडियावर टाकत आहेत.

आता 'शाका लाका बूम बूम' (Shaka Laka Boom Boom ) फेम संजू देखील लग्नबंधनात अडकला आहे. नुकताच संजूची भूमिका साकारणारा अभिनेता किंशुक वैद्यचा विवाह पार पडला आहे. किंशुक वैद्यने आपल्या गर्लफ्रेंड दिक्षा नागपाल (Diksha Nagpal) सोबत लग्नगाठ बांधली आहे.

किंशुक (Kinshuk Vaidya) आणि दिक्षाचा लग्नसोहळा २२ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी वार पडला. मराठी पद्धतीने त्यांनी लग्नगाठ बांधली. ही दोघही लग्नात पारंपरिक कपड्यांमध्ये दिसले. किंशुक ऑफ व्हाईट रंगाची कुर्ता आणि धोतर परिधान केलं होते. तर दिक्षाने लाल आणि केशरी रंगाच्या नऊवारी साडी नेसली होती. दोघेही एकत्र खुपच छान दिसत होते. त्यांचे लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

किंशुक आणि दिक्षा अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांचा गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात साखरपुडा पार पडला. किंशुक वैद्य हा 'शाका लाका बूम बूम' या शोमुळे खूप जास्त प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

'एक रिश्ता साझेदारी का' आणि 'राधाकृष्ण' या त्याच्या गाजलेल्या मालिका आहेत. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. दीक्षाही कोरियोग्राफर आहे. तिने आपल्या डान्सने चाहत्यांना वेड लावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: आजच्या युवकांनी विचार करण्याची गरज आहे- अजित डोवाल

Pune Politics: ठाकरेसेनेच्या शहरप्रमुखांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं कारण काय?; वसंत मोरेंनी VIDEO केला पोस्ट

Cyber Crime : मुंबईत 'म्युल अकाउंट' रॅकेटचा पर्दाफाश; ७ जण अटकेत, १० लाखांची रोकड जप्त

Salman Khan: 'माझा मोठा भाऊ...'; संजू बाबासाठी रात्री १.४० वाजता सलमान खानने केली प्रेमळ भावूक पोस्ट

Pune : पुण्यात पावसाचा जोर ओसरला, पाणीपुरवठा करणारी ४ धरणे भरली, किती टक्के आहे साठा? वाचा

SCROLL FOR NEXT