Shah Rukh Khan and Gauri Khan first valentine gift SaamTv
मनोरंजन बातम्या

Shahrukh Khan's Valentine Gift: गौरीनं 34 वर्षांपूर्वी किरकोळ गिफ्ट स्वीकारत शाहरुखवर विश्वास टाकला, आज राणी म्हणून जगतेय

शाहरुख खान-गौरी खानच्या गिफ्टची सोशल मीडियावर चर्चा.

Pooja Dange

Shahrukh Khan 1st Valentine Gift To Gauri Khan: व्हॅलेंटाईन डेमुळे आज सर्वत्र प्रेममय वातावरण आहे. सोशल मीडियावर देखील प्रेमाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटी सुद्धा पोस्ट करत त्यांच्या जोडीदाराला शुभेच्छा देत आहेत. प्रेम आणि रोमान्स म्हटल्यावर एका कलाकाराचे नाव आपसूकच तोंडावर येते. रोमान्सचा बादशाह किंग खानचे.

शाहरुख आणि आणि गौरी खान यांची लव्ह स्टोरी तर सर्वांचं माहित आहे. शाहरुख खानला गौरी खानने दिलेली साथ जगजाहीर आहे. आज व्हॅलेंटाईन डे निमित्त सोशल मीडियावर एका नेटकाऱ्याने शाहरुख खानला त्याच्या आणि गौरीविषयीचा एक प्रश्न केला आहे. शाहरुख खान सुद्धा अगदी विचारपूर्वक उत्तर दिले.

शाहरुख खान #AskSRK हे सेशनद्वारे त्याच्या फॅन्सशी संवाद साधत असतो. #AskSRK दरम्यान फॅन्स शाहरुखला अनेक प्रश्न विचारतात आणि शाहरुख त्यांच्या जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे देण्याचे प्रयत्न करतो.

#AskSRK नुकत्याच झालेल्या सेशनमध्ये त्याची फॅन त्याला विचारते, तुम्ही गौरी मॅमला पहिले व्हॅलेंटाईन डेला काय गिफ्ट दिले होते? यावर उत्तर देत शाहरुख खान म्हणाला, मला व्यवस्थित आठवतंय याला आता ३४ वर्ष झाली आहेत... तेव्हा मी तिला कदाचित गुलाबी प्लॅस्टिकचे कानातले दिले होते...

शाहरुख खान त्याच्या गर्लफ्रेंडला त्यांच्या पहिल्या व्हॅलेंटाईन डेला जास्त काही देता आले नसेल. पण दोघांनी एकत्र यश मिळवले आहे. आज अशी कोणतीही गोष्ट नाही जी शारुख खान त्याच्या पत्नीला देऊ शकत नाही.

शाहरुख आणि गौरीच्या नात्याला ३४ वर्ष झाली आहेत. तरीही त्यांचे प्रेम कमी झालेले नाही. जीवनात त्यांनी अनेक चढ-उतारा पहिले असतील. पण दिघेही एकमेकांसोबत उभे आहेत. या जोडप्याला तीन मुले आहेत. तर बराच काल गॅप घेतल्यानंतर गौरी पुन्हा तिच्या करिअरकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

शाहरुख सध्या त्याच्या 'पठान' आणि 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. जाईल चित्रपट यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर 'पठान' चित्रपट जगभरात सर्वाधिक कलेक्शन करणारा चित्रपट ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Taloda Heavy Rain : मुसळधार पावसामुळे आतोनात नुकसान; मिरचीसाठी अडीच लाख खर्च, उत्पन्न २५ हजाराचे

Maharashtra Live News Update : ठाकरे गटाच्या शिवतीर्थावरील दसरा मेळव्याला परवानगी

Pitru Paksha 2025: पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पितृपक्षात करा हे दान

Shocking : भयंकर! छातीवर बसून नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला; बॉयफ्रेंडचं कृत्य, बायको निर्दयतेने बघत राहिली

Heart Attack: अपुऱ्या झोपेमुळे ४५% लोकांना हार्ट अटॅक; कोणत्या वयोगटाला धोका जास्त? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT