Shahrukh Khan with son aryan Saam TV
मनोरंजन बातम्या

Shahrukh Khan: चाहत्यांची शाहरुख खानला 'We Miss You SRK' माध्यमातून ट्विटरवर परतण्याची साद

आगामी काळात शाहरुख सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठाण' या चित्रपटात चाहत्यांना दिसणार आहे.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : ‘बॉलिवुडचा राजा’ म्हणून ज्याला युवा वर्ग ज्याला संबाेधितात त्या आपल्या लाडक्या शाहरुख खानला (shahrukh khan) चाहते मिस करीत आहे. बादशाह बऱ्याच दिवसांपासून ग्लॅमरच्या दुनियेतून गायब झाला आहे. त्याचा शेवटचा चित्रपट झिरो 2018 मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर ताे रुपेरी पडद्यावर दिसला नाही. आता तर त्याच्या आर्यनला अटक झाल्यापासून त्याने ट्विटरवर देखील त्याच्या चाहत्यांशी संवाद साधणे साेडून दिले आहे. अखेर गुरुवारी संध्याकाळपासून त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करीत 'We Miss You SRK' ट्रेंड केला.

चाहते शाहरुखला (shah rukh khan ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी आपल्या भावना शाहरुख पर्यंत पाेहचाव्यात म्हणून ट्विटरचा (Twitter) आधार घेत हॅशटॅगमध्ये ‘वी मिस यू एसआरके’ असा ट्रेंड केला.यामध्ये शाहरुखचे जुने छायाचित्र, व्हिडिओ आणि आठवणी ट्विट केल्या जाताहेत. अनेकांनी शाहरुखला (shahrukh khan) किमान ट्विटरवर त्याचा प्रसिद्ध ‘AskSRK’ आयोजित करण्याची विनंती केली. जेणेकरुन आम्हांला प्रश्नांची उत्तर मिळतील असे एका चाहत्याने नमूद केले.

एका चाहत्याने ट्विट केले, "4 महिने झाले #WeMissYouSRK आशा आहे की लवकरच परत याल" दुसर्‍या एका चाहत्याने लिहिले, “तुझ्याशिवाय बॉलीवूड बॉलीवूड नाही.” हजाराे चाहते शाहरुखला मिस करीत असल्याचे सांगत आहेत.

आर्यन खान यास गेल्या वर्षी मुंबईत ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. तो आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट यांनी एक महिना आर्थर रोड तुरुंगात काढला आणि नंतर अटींसह त्यांची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर शाहरुखने कोणतेही सार्वजनिक ट्विट केलेले नाही. त्यामुळे चाहते त्याला परतण्याची विनंती करीत आहेत.

आगामी काळात शाहरुख सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठाण' या चित्रपटात चाहत्यांना दिसणार आहे. परंतु समाज माध्यमातून त्याने आमच्याशी संवाद साधावा असा आग्रह चाहते करु लागले आहेत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Down: व्हॉट्सअॅप अचानक डाऊन, सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

Maharashtra Live News Update: गणेश विसर्जन मिरवणुकीत वाहन पलटी; १०-१२ जण जखमी... वाहनातून गणेश मूर्ती पडली

IRCTC Jyotirlinga Yatra: बम बम भोले! भारतीय रेल्वेची ज्योतिर्लिंग यात्रा, कसं कराल तिकीटाचं बुकिंग, जाणून घ्या यात्रेची संपूर्ण माहिती

Shirpur : सुरुंग फुटून अंगावर पडला दगड; शिरपूर तालुक्यातील जवानाला लद्दाख येथे वीरमरण

Gardening Tips : या सोप्या टिप्स वापरून घरीच उगवा हिरवीगार पालक

SCROLL FOR NEXT