Don 3 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Don 3: डॉन परत आला! रणवीर बाहेर पडल्यानंतर, बादशाहाची 'डॉन ३'मध्ये एन्ट्री; या अटीवर करणार चित्रपट

Don 3: बहुप्रतिक्षित 'डॉन ३' चित्रपटात शाहरुख खानची जागा रणवीर सिंग घेणार होता, पण आता तो या चित्रपटातून बाहेर पडला आहे. रणवीरच्या जाण्याने शाहरुख खान परतणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

Shruti Vilas Kadam

Don 3: फरहान अख्तरच्या सुपरहिट फ्रँचायझी 'डॉन'च्या तिसऱ्या भागाबद्दल खूप उत्सुकता आहे. पण अजून चित्रपटाचे चित्रीकरण सुरूही झालेले नाही. सुरुवातीला रणवीर सिंग 'डॉन' म्हणून शाहरुख खानची जागा घेणार होता, पण 'धुरंधर'च्या रिलीजनंतर, असे वृत्त आले की त्याने 'डॉन ३' सोडला आहे. त्यानंतर, चित्रपटासाठी दुसऱ्या अभिनेत्याशी संपर्क साधण्यात आला होता.

पण आता, रियल डॉन, शाहरुख खान चित्रपटात दिसणार असल्याचे बोलले जात आहे. याचा अर्थ आता शाहरुख खान 'डॉन ३' मध्ये गँगस्टरच्या भूमिकेत झळकणार आहे. परंतु तो या चित्रपटात एका अटीवर दिसणार आहे. अशी अफवा आहे की शाहरुख खानने फरहान अख्तरसमोर एक अट ठेवली आहे आणि तो फक्त त्या अटीवरच 'डॉन ३'मध्ये काम करेल.

शाहरुख खानचे 'डॉन ३' मध्ये?

टेलीचक्करच्या वृत्तानुसार, शाहरुख खान 'डॉन ३' मध्ये काम करण्यास तयार झाला आहे आणि तो त्याच्या आयकॉनिक भूमिकेत दिसणार आहे. पण, त्याने फरहान अख्तरसमोर एक अट ठेवली आहे. जी त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'जवान'चे दिग्दर्शक अॅटलीशी संबंधित आहे.

'डॉन ३' साठी शाहरुखने कोणती अट ठेवली होती?

रिपोर्ट्सनुसार, शाहरुख म्हणाला अ‍ॅटलीला फ्रँचायझीमध्ये काम करणार असेल तरच शाहरुख डॉन ३ चा भाग होईल. चित्रपटाला अधिक उत्तम करण्यासाठी शाहरुख खानला अ‍ॅटलीला या चित्रपटात घ्यायचे आहे. पण, निर्मात्यांना अजून कोणताही निर्णय घेतला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपा नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट

Harmanpreet Singh: टीम इंडियाचं मिशन वर्ल्डकप! 51 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय हॉकी संघ सज्ज

Face Care: महागडा फेसवॉश कशाला? फक्त ३ गोष्टी आणि तयार होईल राइस फेसवॉश, चेहरा दिसेल नॅचरली ग्लोइंग

Pune : पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; १६ आस्थापनांचे परवाने निलंबित

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत; राज्यातील बड्या मंत्र्याचं मोठं विधान, थेट भाजपला डिवचलं

SCROLL FOR NEXT