Shahir Dinanath Sathe Dies Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shahir Dinanath Sathe Dies: शाहीर दीनानाथ साठे-वाटेगावकर यांचं वृद्धापकाळाने निधन; वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Chetan Bodke

Shahir Dinanath Sathe Passed Away

मराठी सिनेसृष्टीतून दु:खद बातमी येत आहे. शाहीर दीनानाथ साठे- वाटेगावकर यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले आहे. शाहीर दिनानाथ साठे मुळचे सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, चार मुली आणि नातवंड असा परिवार आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊंच्या शाहिरीचा पगडा असलेले दीनानाथ साठे पुण्याच्या जिल्हा परिषदेतून उप जिल्हा क्रिडा अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. त्यांनी १९६९ पासून ते आजवर अनेक ठिकाणी शाहिरीचे कार्यक्रम केले आहेत. त्यांनी अनेकदा शाहिरांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि काही मागण्यांसाठी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी अनेक सामाजिक संस्थेमध्ये मोलाचे कार्यही केले आहेत.

शाहीर दीनानाथ साठे- वाटेगावकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने 'लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार'ने गौरविण्यात आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनेल हॅक !

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

SCROLL FOR NEXT