Shahid Kapoor saam tv
मनोरंजन बातम्या

Shahid Kapoor : शाहिद कपूरचा थरारक अवतार; O Romeo चं फर्स्ट लूक पोस्टर पाहून अंगावर येईल काटा, चित्रपटाची रिलीज डेट काय?

Shahid Kapoor-O Romeo First Look : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा 'ओ रोमिओ' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.चित्रपटाचे पहिले लूक पोस्टर समोर आले.

Shreya Maskar

शाहिद कपूरच्या O Romeo चित्रपटाचे पहिले लूक पोस्टर समोर आले.

'ओ रोमिओ' चित्रपट फेब्रुवारी 2026मध्ये प्रदर्शित होणार आहे.

'ओ रोमिओ' हा एक रोमँटिक, ॲक्शन ड्रमा आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'ओ रोमिओ' मुळे चांगला चर्चेत आहे. शाहिद कपूरच्या 'ओ रोमिओ' चित्रपटाचा पहिली लूक पोस्टर समोर आला आहे. यात शाहिदचे खतरनाक रुप पाहायला मिळत आहे. ज्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक दिसत आहेत. 'ओ रोमिओ'च्या लूक पोस्टरची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.

'ओ रोमिओ' चित्रपटाच्या लूक पोस्टरमध्ये शाहिद कपूर रक्तबंबाळ अवस्थेत पाहायला मिळत आहे. त्याच्या शरीरावर सर्वत्र रक्त दिसत आहे. त्याच्या डोळ्यात आग आणि चेहऱ्यावर भयंकर हास्य आहे. तो मोठ्याने ओरडताना दिसत आहे. त्याच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. आलिया भट्टने पोस्टवर कमेंट केली की, "या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे!"

O Romeo रिलीज डेट काय?

शाहिद कपूरचा 'ओ रोमियो' (O ROMEO) चित्रपट 13 फेब्रुवारी 2026ला रिलीज होणार आहे. म्हणजे येणारा 'व्हॅलेंटाईन डे' खूप खास असणार आहे. चित्रपट अ‍ॅक्शन-थ्रिलर आणि रोमँटिक चित्रपट आहे.

O Romeo स्टार कास्ट

'ओ रोमियो' चे निर्माते विशाल भारद्वाज आहेत. 'ओ रोमियो'मध्ये शाहिद कपूरसोब तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसेच चित्रटात खूप तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. यात दिग्गज अभिनेते नाना पाटेकर , रणदीप हुडा , दिशा पटानी आणि फरीदा जलाल यांचा समावेश आहे. चाहते आता टीझरची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: 9 वर्षांनंतर अचानक समोर आला बॉयफ्रेंड आणि....! लॉन्ग डिस्टन्स कपलचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Tilgul Ladoo: तिळगुळ लाडू मऊ होण्यासाठी वापरा 'या' ३ सोप्या ट्रिक्स; ही आहे सोपी रेसिपी

Pune : प्रशांत जगतापांचे गुंड टिपू पठाणशी "घनिष्ट" संबंध? जामिनावर बाहेर आलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून आरोप

Maharashtra Live News Update : पुण्यात अजित पवारांचा भव्य रोड शो

PF Withdrawal: कामाची बातमी! या UPI App मधून काढता येणार PF चे पैसे, वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT