shahid kapoor and kriti sanon in new movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Cocktail 2 : सैफ आणि दीपिकाच्या जागी शाहिद आणि क्रितीची रिप्लेसमेंट; १२ वर्षांनंतर बनणार चित्रपटाचा सिक्वेल

Cocktail 2 : शाहिद कपूर आणि क्रिती सॅननचा 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' हा चित्रपट लोकांना आवडला. आता शाहिद आणि क्रिती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Cocktail 2 : बॉलीवूडची मस्तानी दीपिका पदुकोण आणि पतौडी नवाब सैफ अली खानचा 'कॉकटेल' चित्रपट नवदिच्या काळातील तरुणांसाठी विशेष आवडता चित्रपट आहे. या चित्रपटात लव्ह ट्रँगल दाखवण्यात आला होता. या चित्रपटातील गाण्यांचीही खूप चर्चा झाली होती. आता १२ वर्षांनंतर दिग्दर्शक होमी अदजानिया 'कॉलटेल'चा सिक्वेल बनवणार आहे. पण या चित्रपटात सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण नाही तर शाहिद कपूर आणि क्रिती सॅनन एकत्र काम करताना दिसणार आहेत.

माहितीनुसार, 'कॉकटेल' नंतर दिनेश विजन 'कॉकटेल 2'ची निर्मिती करणार झाला आहे. मात्र, यावेळी चित्रपटात बदल पाहायला मिळणार आहेत. पण मागील चित्रपटाप्रमाणे या चित्रपटातही लव्ह ट्रँगल पाहायला मिळणार असून शाहीद कपूर आणि क्रिती सॅननसह या चित्रपटात रश्मिका मंदान्ना देखील दिसणार असल्याचे वृत्त आहे.

'कॉकटेल 2' कधी रिलीज होणार ?

२०१२ मध्ये 'कॉकटेल' रिलीज झाला तेव्हा हा चित्रपट दीपिका पदुकोणसाठी गेम चेंजर ठरला. या चित्रपटानंतर तिच्या करिअरचा ड्रफ वाढतच गेला. या चित्रपटाची कथा इम्तियाज अली यांनी लिहिली होती. या चित्रपटात एक प्लेबॉय, फोटोग्राफर आणि एक रूढीवादी मुलची प्रेम कथा दाखवण्यात आली होती. माहितीनुसार, सध्या 'कॉकटेल 2' साठी कास्टिंग चालू आहे आणि मे 2025 मध्ये हा चित्रपट रिलीज होऊ शकते.

शाहिद कपूर-क्रिती सॅनन वर्कफ्रंट

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहिद कपूर शेवटचा 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' मध्ये दिसला होता. सध्या तो रोशन अँड्र्यूच्या 'देवा' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत पूजा हेगडे आहे. क्रिती सॅननबद्दल बोलायचे झाले तर ती 'क्रू'मध्ये दिसली आहे. याशिवाय क्रिती सॅनन शाहीर शेखसोबत 'दो पत्ती' मध्येही दिसली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

SCROLL FOR NEXT