Dunki Announcement Video You Tube
मनोरंजन बातम्या

Dunki Announcement Video: किंग खानचा ‘डंकी’मधला नवा लूक व्हायरल; निर्मात्यांनी शेअर केला चित्रपटाचा खास व्हिडीओ

सोशल मीडियावर शाहरूखचा ‘डंकी’ चित्रपटातील एक आर्मी ऑफिसरच्या लूकमधील फोटो व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Shah Rukh Khan Dunki Film Announcement Video: बॉलिवूडचा किंग खान चार वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर तो पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर परतला आहे. शाहरूखचा गेल्या काही दिवसांपुर्वी ‘पठान’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने भारतातच नाही तर जगभरातही चांगलीच चर्चा झाली. लवकरच शाहरूखचा ‘डंकी’ आणि ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच सोशल मीडियावर शाहरूखचा ‘डंकी’ चित्रपटातील एक आर्मी ऑफिसरच्या लूकमधील फोटो व्हायरल होत आहे.

शाहरूखने दुरदर्शनवरील फौजी यी सीरियलमध्ये आर्मीच्या जवानाची भूमिका साकारली होती, ते पात्र सर्वांनाच फार भावले. सोबतच त्यानंतर शाहरूखने ‘मैं हू ना’ आणि ‘जब तक है जान’मध्ये लष्करच्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर पुन्हा एकदा शाहरूख ‘डंकी’ मधून एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.(Latest Marathi News)

नुकतंच निर्मात्यांनी चित्रपटाच्या अनाऊंसमेंट व्हिडीओत, शाहरूख हिरव्या रंगाचा टी- शर्ट आणि पँट, खांदावर लटकवलेली बॅग या लूकमध्ये शाहरूख दिसतोय. ‘डंकी’ मध्ये अशा लोकांची कथा आहे ज्यांना घरी परतायचे आहे. हा एक लांबचा प्रवास आहे जो संपूर्ण जगाचा प्रवास करून भारतात परत येतो. (Latest Entertainment News)

नुकताच जवानाचा एक व्हिडिओही लीक झाला होता, ज्यामध्ये शाहरुख एका गाण्यासाठी शूट करताना दिसत होता. शाहरुखचा तो व्हिडीओ पाहिल्यानंतर एका चाहत्याने ‘जवान’ चित्रपटातील एका गाण्याची कोरिओग्राफी फराह खान करत असल्याचे सांगितले.

शाहरुख खान याआधी ‘पठान’मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता.(Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

SCROLL FOR NEXT