Shahrukh Khan: किंग खानसोबत शारीरिक संबंध होते का? प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाला? Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shahrukh Khan: किंग खानसोबत शारीरिक संबंध होते का? प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाला?

Shahrukh Khan: शाहरुख खान आणि विवेक वासवानी यांचं नातं सिनेसृष्टीत नेहमीच चर्चेचा विषय राहिलं आहे. काही रिपोर्ट्सनुसार शाहरुख आणि विवेक यांचं नातं केवळ मैत्रीपरुत नसून त्यांच्यात शारीरिक जवळीक देखील होती असा दावा करण्यात आला आहे.

Shruti Vilas Kadam

Shahrukh Khan: शाहरुख खान आणि विवेक वासवानी यांचं नातं सिनेसृष्टीत नेहमीच चर्चेचा विषय राहिलं आहे. शाहरुखच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात, तो काही काळ विवेक वासवानी यांच्या घरी राहत होता. या काळात दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. मात्र याच मैत्रीवर आधारित अनेक अफवा देखील पसरल्या. विशेषतः सोशल मीडियावर आणि काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की शाहरुख आणि विवेक यांचं नातं केवळ मैत्रीपरुत नसून त्यांच्यात शारीरिक जवळीक देखील होती.

या अफवांवर आता स्वत: विवेक वासवानी यांनी मौन सोडलं आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांना थेट विचारण्यात आलं, "शाहरुख खानसोबत तुझे शारीरिक संबंध होते का?" यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं की, “अशी कोणतीही बाब आमच्या नात्यामध्ये नव्हती. आमचं नातं एक प्रामाणिक मैत्रीचं होतं. आम्ही एक फॅमली आहोत.”

विवेक वासवानी यांनी यापूर्वीही काही मुलाखतींमध्ये शाहरुखशी असलेल्या नात्याबाबत भरभरून बोलले होते. त्यांनी सांगितलं होतं की, जेव्हा शाहरुख मुंबईत आले, तेव्हा त्यांचं कुठेही घर नव्हतं. तेव्हा विवेकने त्यांना त्यांच्या घरी राहण्याची जागा दिली. दोघांनी एकत्र चित्रपटांसाठी ऑडिशनही दिली. नंतर विवेकनेच शाहरुखला काही निर्मात्यांकडे घेऊन जाऊन लागला यामुळे शाहरुखला "राजू बन गया जेंटलमैन" सारख्या चित्रपटांत काम मिळवून दिलं.

विवेक पुढे म्हणाला, “लोक अशा गोष्टी पसरवतात कारण त्यांना कंट्रोव्हर्सी हवी असते. पण मला हे स्पष्ट सांगायचं आहे की आमचं नातं केवळ मैत्रीचं होतं. शाहरुख हा ‘वन वुमन मॅन’ आहे. त्याचं संपूर्ण प्रेम आणि नातं फक्त गौरीशी आहे. आज आम्ही दररोज बोलत नाही, भेटत नाही. पण कधी भेटलो तरी आम्ही दोन जिवलग मित्रांसारखेचं भेटतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair dye reaction: केसांना कलर केल्यास होऊ शकते रिएक्शन; अॅलर्जी झाल्यास दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच ओळखा

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक

Kumbha Rashi : आरोग्याची समस्या, पण ध्यान-प्रार्थनेत दडलेले गुपित यश, वाचा राशीभविष्य

Smartphone Addiction : रात्री झोपण्यापूर्वी फोन वापरणं ठरतंय घातक, तज्ज्ञांचा इशारा

Param Sundari Collection : सिद्धार्थ-जान्हवीच्या केमिस्ट्रीची चाहत्यांना भुरळ, 'परम सुंदरी'ची २ दिवसांत छप्परफाड कमाई

SCROLL FOR NEXT