Shah Rukh Khan Visited Lalbagh Raja with Son Abraham  Saam TV
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan At Lalbaugcha Raja: लेक अब्राहमसह शाहरुख खान लालबागच्या राजाच्या दर्शनाला; Video व्हायरल

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानने घेतेले लालबागच्या राजाचे दर्शन.

Pooja Dange

Shah Rukh Khan Seeks Blessing Of Lalbaugcha Raja:

गणेशोत्सवाची सर्वत्र धूम आहे. त्यात मुंबईतील गणेशोत्वाची रंगात खूप वेगळी असते. मोठे-मोठे गणपाती, त्यांची भव्य सजावट, देखावे या सर्व वातावरणाची अनेकांना भुरळ पडते.

मुंबईतील गणेश गणपती मंडळे प्रसिद्ध आहेत. लालबागच्या राजाच्या तर थाटाचं न्यारा. लालबागच्या राजाच्या चरणी सर्वसामान्यांपासून अनेक दिग्गज मंडळी हजेरीत लावतात. पाळीच्या दिवसापासूनच सेलिब्रिटींनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावली

बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानने देखील नुकतेच लालबागच्या राजाचे दर्शन घेतेले आहे. शाहरुख त्याच्या छोटा मुलगा अब्राहमसह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानी देखील होती.

शाहरुख खानचे लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेले तेव्हापासून त्याचेआणि त्याच्या मुलाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शाहरुख खान लालबागच्या राजाच्या पायावर डोकं टेकून बाप्पाचा आशीर्वाद घेतला. छोटा अब्राहम देखील हात जोडून उभा होता.

यावेळी शाहरुखने सफेद रंगाचं शर्ट घातलं होता आणि गॉगल लावला होता. शाहरुख नेहमीप्रमाणे हँडसम दिसत होता. तर अब्राहमने लाल रंगाचा सदरा घातला होता.

शाहरुख खान गणपतीचा भक्त आहे. त्याने त्याच्या घरी देखील गणपती बाप्पा आणले होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी शाहरुख खानने त्याच्या घरातील बाप्पाचा फोटो शेअर केला होता. तसेच अंबानी कुटुंबाच्या गणेशोत्वाला देखील तो सहकुटुंब हजर होता. (Latest Entertainment News)

अनेक सेलिब्रिटी लालबागच्या राजाच्या दर्शनाला जात असतात. आता त्यात बादशहा शाहरूख खानने लालबागच्या चरणी वर्णी लावली आहे.

पहिल्या दिवशी अभिनेता कार्तिक आर्यनने लालबागच्या राजाच्या दर्शनाने गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. त्यानंतर ईशा देओल देखील लालबागच्या राजाच्या दर्शनाला अनवाणी गर्ली होती. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT