Shah Rukh Khan Viral Tweet Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan News: शाहरुख खानचं एक ट्वीट अन् स्विगीची टीम जेवण घेऊन पोहोचली 'मन्नत'बाहेर; फोटो व्हायरल

Shah Rukh Khan Viral Tweet: शाहरूखने ट्विटरवर #AskSRK हे प्रश्नोत्तराचं सेशन सुरू केलं आहे. या सेशनमधलं किंग खानचं एक उत्तर कमालीचं चर्चेत आलं आहे.

Chetan Bodke

Shah Rukh Khan AskSRK: बॉलिवूडचा किंग खान या वर्षी चित्रपटांमुळे सध्या कमालीचा चर्चेत आहे. ‘पठान’ चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर शाहरुख ‘जवान’मध्ये दिसणार आहे. पुन्हा एकदा शाहरूखने ट्विटरवर #AskSRK हे प्रश्नोत्तराचं सेशन सुरू केलं आहे. या माध्यमातून शाहरूख आपल्या चाहत्यांना अनेक प्रश्नांचे उत्तर देत असतो. त्याच सेशनमधलं किंग खानचं एक उत्तर कमालीचं चर्चेत आलं आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी मन्नत बंगल्याबाहेर, शाहरूखच्या चाहत्यांनी त्याची खास सिग्नेचर स्टेप चाहत्यांनी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड केला आहे. बॉलिवूडच्या किंग खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते वेडे आहेत. शाहरुख हा नेहमी चर्चेचा विषय असतो. कधी त्याच्या अभिनयामुळे तर त्याच्या चाहत्यांमुळे. अशातच त्याच्या एका रिप्लायमुळे शाहरुख पुन्हा चर्चेत आला आहे.

शाहरुख खान हा नेहमीच ट्वीटरवरुन चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत असतो. अशातच त्याला त्याच्या एका चाहत्याने 'जेवलात का?' असं विचारलं यावर शाहरुख खान म्हणाला की, 'का तुम्ही स्विगीकडून आहात का,जेवण पाठवणार का?' शाहरुखच्या या उत्तरानं मात्र स्विगीचं जबरदस्त प्रमोशन झालं आहे.

शाहरुखच्या या उत्तरावर मात्र स्विगीने लगेच रिप्लाय दिला की, 'आम्ही आहोत स्वीगी कडून, जेवण पाठवू काय?' स्वीगीने फक्त विचारलचं नाही तर चक्क शाहरुख खानच्या मन्नतवर जेवण पाठवूनही दिलं. स्विगीने ट्वीटरवरुन काही डिलिवरी बॉइज चा मन्नतबाहेरील फोटो पोस्ट करुन 'आम्ही जेवण घेऊन आलो आहोत' असं लिहल आहे. या ट्वीटवर चाहत्यांनी मात्र भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

स्विगीच्या या सर्व्हिसमुळे मात्र स्विगी प्रचंड चर्चेत आली आहे. स्वीगी ही एक फूड डिलेव्हरी करणारी कंपनी आहे. २०१४ पासून ही कंपनी फूड डिलेव्हरी काम करत आहे. फूड डिलेव्हरी क्षेत्रात स्विगीचं नाव अग्रेसर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bail Pola : सातपुड्यात आहे बैलांचे ब्युटी पार्लर; पोळ्यासाठी महिला तयार करतात खास बैलांचा शृंगार

Raigad: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात बोट बुडाली, अनेकजण अडकल्याची भीती, थरारक VIDEO समोर

Maharashtra Live News Update : रायगड समुद्रात बोट बुडाली

'नोरा फतेहीसारखी फिगर बनव' ३ तास जिम अन् उपाशी ठेवलं; पतीकडून पत्नीचा अतोनात छळ

Neena Gupta: 'त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना हेवा वाटतो...' शॉर्ट्स घातल्याबद्दल ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला नीना गुप्तांचं बेधडक उत्तर

SCROLL FOR NEXT