Aryan Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aryan Khan: 'लेकापेक्षा बाप परवडला...', आर्यनचा भलताच माज म्हणत नेटकरी संतापले

आर्यन खान सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे बराच चर्चेत असतो, पण यावेळी तो त्याच्या एका कृत्यामुळे चर्चेत आला आहे.

Chetan Bodke

Aryan Khan Trolled: शाहरुख खान सध्या 'पठान' चित्रपटाला मिळत असलेल्या अभूतपुर्व यशामुळे बराच चर्चेत आहे. पण लगेचच तो आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र झाला आहे. पण आज आपण शाहरुखबद्दल बोलणार नसून त्याचा मुलगा आर्यनबद्दल बोलणार आहे. अनेकदा सोशल मीडियावर आर्यन खान कोणत्या ना कोणत्या प्रकरणामुळे बराच चर्चेत होता. तो अनेकदा त्याच्या स्टाईलमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असतो, यावेळी पुन्हा एकदा आर्यन त्याच्या घमंडी वृत्तीमुळे चर्चेत आला आहे.

आर्यनचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत आर्यन त्याच्या एका अलिशान कारमधून खाली उतरतो, तो उतरताच समोर उभे असलेले पापाराझी त्याला थांबण्याची विनंती करतात. मात्र, आर्यन ऐकल्याचं नं ऐकलं करतो आणि नं थांबताच त्याच्या बॉडीगार्ड्स सोबत तो थेट पुढे निघून जातो.

हा व्हायरल होणारा व्हिडीओ युजर्सने पाहिल्यानंतर आर्यनला बऱ्याच प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. तु एवढा कोणता अहंकार दाखवतोस? असा सवाल यावेळी एका युजरने केला. तर आणखी एक युजर म्हणतो, त्याला शाहरुखने कदाचित माध्यमांसोबत संवाद न साधण्याचा मोलाचा सल्ला यावेळी दिला. तु तर पुन्हा ॲटिट्यूड दाखवला... असा टोमणाही एकाने मारला आहे. तर अनेकांनी वडिलांसोबतही आर्यनची तुलना केली आहे.

आर्यन खानला अभिनयात रस नाही. आर्यनची इच्छा चित्रपट निर्मिती आणि क्रिएटिव्ह कामामध्ये आहे. तो वेब सीरिजमधून लेखक म्हणून पदार्पण करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यनचा सर्वात पहिला प्रोजेक्ट वर्षअखेरीस येण्याची शक्यता आहे. सध्या या वेबसीरिजचे काम जोरात सुरु असून अनेक कलाकारांनी वेबसीरिजसाठी ऑडिशनही दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT