Shah Rukh Khan shares New Poster Of Jawan Instagram @redchilliesent
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan Share Jawan Poster : शाहरुख खानचा जवानमधील किलर लूक ; नवीन पोस्टर पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली

Jawan New Poster : आस्कएसआरके या सेशन दरम्यान शाहरुखने त्याचा जवानमधील लूक शेअर केला आहे.

Pooja Dange

Shah Rukh Khan New Bald Look : शाहरुख खानच्या जवान चित्रपटाची सध्या चर्चा आहे. या चित्रपटाच्या प्र्व्ह्युव्ह व्हिडिओने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओने विक्रम केला आहे. या सगळ्यात आता चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

जवान प्रदर्शित होण्याआधी शाहरुख खान चित्रपटाचे जोमाने प्रमोशन करत आहेत. या दरम्यान त्याने ट्विटरवर आस्क एसआरके हे सेशन घेतलं आणि चाहत्यांशी संवाद साधला. शाहरुखला चाहत्यांनी चित्रपटाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले. (Latest Entertainment News)

आस्कएसआरके या सेशन दरम्यान शाहरुख खानने त्याचा जवानमधील लूक शेअर केला आहे. हातात बंदूक घेतलेला शाहरुख त्याच्या बॉल्ड लूक फ्लॉन्ट करत आहे. तयार शाहरुखने ऑलिव्ह ग्रीन रंगांचे टी-शर्ट घातले असून त्यावर चेक्सचे मरून रंगाचे शर्ट पेअर केले आहे.

"आता कामावर परतावे लागेल. जवानच्या रिलीजसाठी तयार होत आहे. #AskSRK साठी तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. चित्रपटाचे पोस्टर पाठवण्याचे वचन दिले आहे आणि अर्थातच खूप आणि खूप प्रेम. आपण सर्वजण सिनेमागृहात भेटू," असे शाहरुखने त्या पोस्टरसोबत लिहिले आहे.

तसेच हा फोटो रेड चिलीज एंटरटेनमेंटने देखील त्यांच्या सोशल मीडियावरून हे पोस्टर शेअर केले आहे.

जवानचा प्रिव्ह्यू निर्मात्यांनी 10 जुलै रोजी शेअर केला होता. त्यात शाहरुखने मुखवटा घातलेल्या आणि डॅशिंग टक्कल असलेल्या सहा वेगवेगळे अवतार दिसला.

जवानमध्ये नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या पात्रांची झलकही पाहायला मिळाली. तसेच दीपिका पदुकोण या चित्रपटात विशेष भूमिकेत दिसणार असल्याचे या प्रिव्ह्युव्हमध्ये दिसले. अॅटली दिग्दर्शित, या चित्रपटात सान्या मल्होत्रा, प्रियामणी, रिद्धी डोगरा, गिरीजा ओक आणि इतर अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत.

जवान 7 सप्टेंबर 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानचा या वर्षीचा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार दुसरा चित्रपट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT