Salman Khan Booked Jawan's Ticket Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jawan चा Preview Video एकच नंबर; तोंडभरून कौतुक करत शाहरुखच्या ‘या’ मित्राने बूक केलं तिकीट

Salman Khan Booked Jawan's Ticket: शाहरुखच्या चित्रपटाचा प्रिव्ह्यू व्हिडिओ पाहून अभिनेत्याच्या एका सेलिब्रिटी मित्राने आधीच तिकीट बुक करून ठेवलंय.

Chetan Bodke

Shah Rukh Khan And Salman Khan Friendship: ॲटली दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटाची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. प्रिव्ह्यू व्हिडिओ प्रदर्शित होताच, व्हिडिओला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. आता प्रेक्षकांना चित्रपटाचा ट्रेलर पाहण्याची फारच इच्छा झाली आहे. हा प्रिव्ह्यू व्हिडिओ पाहून शाहरुखच्या चाहत्यांना त्याच्या चित्रपटाची फारच उत्सुकता लागली.

नुकताच शाहरुखच्या चित्रपटाचा प्रिव्ह्यू व्हिडिओ पाहून अभिनेत्याच्या एका सेलिब्रिटी मित्राने आधीच तिकीट बुक करून ठेवलंय. अभिनेत्याच्या मित्राने आधीच तिकिट बुक केल्याने चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये फारच वाढली.

त्याचा हा मित्र म्हणजे, अभिनेता सलमान खान आहे. सलमानने आपल्या मैत्री खातर हे केल्याचे बोलले जात आहे. हे दोघेही अगदीच खास मित्र असून सलमानने हा प्रिव्ह्यू व्हिडिओ ट्विट करत त्याने पहिले तिकीट बुक केल्याचे सांगितले आहे.

ट्रेलर ट्विट करत अभिनेता म्हणतो, “आता पठान जवान झाला. खूपच सुंदर ट्रेलर, मला खूप आवडला. हा चित्रपट सगळ्यांनी चित्रपटगृहातच जाऊन बघावा, असा हा चित्रपट वाटत आहे. मी तर पहिल्याच दिवशी जाणार आहे. मला ट्रेलर पाहून मज्जा आली, व्वा शाहरुख खान.”

यावर शाहरुखने उत्तर देत म्हणाला, “म्हणूनच भाऊ मी तुम्हाला पहिल्यांदाच माझ्या चित्रपटाचा ट्रेलर दाखवला होता. दिलेल्या शुभेच्छांबद्दल आणि चित्रपटाचं पहिलं तिकिट बुक केल्याबद्दल तुमचे आभार मानतो.” शाहरुखच्या या ट्वीटच्या कमेंट सेक्शनमध्ये नेटकऱ्यांनी सलमान आणि शाहरुखचे जुने फोटो पोस्ट केले आहेत.

सलमान आणि शाहरुख बद्दल बोलायचे, तर हे दोघेही ‘पठान’ मध्ये झळकले होते. ‘पठान’ मध्ये सलमानने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर ही जोडी पुन्हा एकदा ‘टायगर ३’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुख पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT