Akshay Kumar Omg 2 Send To Review Committee: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा येत्या ११ ऑगस्टला त्याचा आगामी चित्रपट ‘OMG 2’मध्ये तो झळकणार आहे. नुकताच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सर्वांनाच ट्रेलरची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अद्याप चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असला तरी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील एका दृश्यामुळे काही शिवभक्तांच्या भावना दुखावल्याचे बोलले जात आहे. रेल्वेच्या पाण्याने भगवान शंकराच्या पिंडीवर रुद्राभिषेक केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अनेक शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.
‘OMG 2’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटावर आक्षेप घेतल्याचे कळतंय. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांना CBFC सोबत अडचणी येत आहेत. निर्मात्यांना हा सिनेमा Review समितीकडे नेण्यास सांगितला आहे. तथापि, ‘OMG 2’ च्या निर्मात्यांना अद्याप CBFC कडून कोणतीही सूचना मिळालेली नाही. अनेकांनी टीझरचे कौतुक केले असून कलाकारांच्याही अभिनयाची कौतुक केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट रिव्हिजन कमिटीकडे पाठवण्यात आला आहे. ‘आदिपुरुष’चित्रपटातून ज्या प्रकारे काही लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, त्याप्रकारे, आता ही त्याची पुनरावृत्ती ‘OMG 2’ सोबत होऊ नये, म्हणून सेंट्रल बोर्डाने ही याची खबरदारी घेतली आहे. त्यामुळे ‘OMG 2’ चं प्रदर्शन तुर्तास रखडलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, CBFC ने चित्रपटाला सर्टिफिकेट देण्यासाठी नकार दिला आहे. दरम्यान, एका हिंदी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, वादग्रस्त संवादामुळे आणि दृश्यामुळे कोणताही वाद होऊ नये म्हणून ‘आदिपुरुष’ला मिळालेल्या प्रतिक्रियांनंतर CBFC हाय अलर्टवर आहे.
सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट रिव्हिजन कमिटीकडे पाठवण्यात आला असून ‘आदिपुरुष’ प्रदर्शित झाल्यानंतर अनेक प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या होत्या. आता त्याची पुन्हा एकदा पुन:रावृत्ती होऊ नये, यासाठी OMG 2 बाबत सेंट्रल बोर्डाने हा खबरदारीचा निर्णय घेतला. त्यामुळे OMG2 चं प्रदर्शन तुर्तास रखडल्याची माहिती आहे.
अक्षय कुमारचे आतापर्यंत प्रदर्शित झालेले सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. अक्षय कुमार शंकर भगवानाच्या भूमिकेत, तर पंकज त्रिपाठी आस्तिक असलेल्या सामान्य माणसाची भुमिका साकारतोय. तर यामी गौतम वकिलाच्या भुमिकेत दिसणार आहे. अक्षयच्या या चित्रपटाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई करणार याचे उत्तर आपल्याला ११ ऑगस्टनंतरच कळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.