Pathaan Advance Booking Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathaan Advance Booking: 'पठान' चित्रपटचे अॅडव्हान्स बुकिंग'या' तारखेपासून होणार सुरू

'पठान' चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग लवकरच सुरू होणार.

Pooja Dange

Pathaan Advance Booking Will Start Soon: बॉलिवूड आगामी चित्रपट 'पठान' प्रदर्शनासाठी सज्ज आहे. दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान असलेल्या या चित्रपटाला अनेक वादांना सामोरे जावे लागत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी अनेक बातम्या प्रदर्शित झाल्या होत्या. आता या सर्व बातम्यांना पूर्ण विराम लावत चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंग सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताबाहेर देखील या चित्रपटाची बुकिंग लवकरच सुरू होणार आहे.

शाहरुख खान 'पठान' चित्रपटाच्या माध्यमातून कमबॅक करणार आहे. शाहरुखला ४ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. आता त्याच्या चित्रपटाला कसा रिस्पॉन्स मिळतो हे आपल्याला 'पठान' चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग कशी होते यावरून कळणार आहे.

भारतासह इतर देशात 'पठान' चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 'पठान'चे अॅडव्हान्स बुकिंग १४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी १० दिवस अॅडव्हान्स बुकिंग सुरू करण्यात आले आहे. बर्लिन, डॉमटोर, म्यूनिख या देशात 'पठान' अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून एका दिवसात या देशातील सर्व चित्रपटगृह हाऊसफुल झाली आहेत.

चित्रपट निर्माती संस्था यशराज फिल्मकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटावरून अनेक वाद निर्माण झाले होते. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहाम यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : महाराष्ट्रात घराणेशाहीचा पराभव; महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर PM नरेंद्र मोदी काय म्हणाले?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

SCROLL FOR NEXT