Shah Rukh Khan Birthday Special  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: 'या' आयकॉनिक गाण्यावर डान्स करत शाहरुख खानाने केली चाहत्यांची इच्छा पूर्ण

शाहरुख खानने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये 'छैय्या छैय्या' गाण्यावर डान्सही केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shah Rukh Khan Birthday Special: २ नोव्हेंबर हा दिवस शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी खूप खास होता. बॉलिवूडच्या बादशाहने त्याच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. शाहरुखने मन्नतच्या बाहेर येऊन चाहत्यांसोबत सेल्फी काढला. यानंतर पठाणचा टीझर आऊट करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. एवढेच नाही तर शाहरुख खानने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये 'छैय्या छैय्या' गाण्यावर डान्सही केला. शाहरुख खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

शाहरुख खान बॉलिवूडमधील असे व्यक्तिमत्त्व आहे, ज्याचे जगभरात चाहते आहेत. सेलेब्स असो वा सर्वसामान्य, लोकांच्या हृदयात शाहरुखचे स्थान काय आहे, हे क्वचितच कुणाला सांगण्याची गरज भासेल. म्हणूनच शाहरुख खानलाही आपल्या चाहत्यांना निराश करणे कधीच आवडत नाही. बादशाहच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात चाहत्यांच्या आग्रहाखातर शाहरुख खानने 'छैय्या छैय्या' या आयकॉनिक गाण्यावर जबरदस्त डान्स केला. (Shah Rukh Khan)

एकीकडे बादशहाच्या वाढदिवसाचा आनंद. दुसरीकडे, त्याला स्टेजवर 'छैय्या छैय्या'वर नाचताना पाहणे हे चाहत्यांसाठी अद्भूत दृश्य होते. किंग खानचा डान्स पाहून चाहते वेडे झाले आहेत. व्हिडिओवर चाहते किंग खानचे कौतुक करून अजूनही थकले नाहीत. (Viral Video)

कार्यक्रमादरम्यान डान्स करण्यासोबतच शाहरुख खानने त्याच्या फिटनेसबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या. किंग खान म्हणाला की, लॉकडाऊनमध्ये तो दोन तास जिममध्ये घालवत होता. त्याने सलमान खान, हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्याकडून व्यायामाच्या टिप्सही घेतल्या. बॉलीवूडच्या बादशहाने वाढदिवसानिमित्त जे काही सांगितले, चाहत्यांना त्याच्या प्रत्येक गोष्टीचे कौतुक केले. (Bollywood)

शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'पठाण' 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Fraud : शहापूरमध्ये मोफत शिबिरात आदिवासी महिलांकडून ३ हजारांची वसूली, डॉक्टर घटनास्थळावरून गायब

Maharashtra Rain Live News: गडचिरोली जिल्ह्यातील 100 गावाचा संपर्क तुटला

Mumbai Rain : मुंबईत पावसाचा हाहाकार, अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी, लोकल ३० मिनिटे उशिराने

कोकणात भाजपची ताकद वाढली; सावंतवाडीत केसकरांच्या विरोधात ठोकला होता शड्डू, शिवसेनेला धक्का

Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न स्टेट्स कसं चेक करायचं? स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

SCROLL FOR NEXT