SRK  SAAM TV
मनोरंजन बातम्या

बॉलिवूडमधला किंग खान सर्वात 'रईस'; सलमान-अमीर आसपासपण नाही, SRK ची संपत्ती किती?

Shah Rukh Khan Net Worth : आपल्या अभिनयाने आणि डायलॉगने किंग खानने संपूर्ण जगाला भुरळ पाडली आहे. सुपरस्टार शाहरुख खानची एकूण मालमत्ता जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडचा किंग खान नेहमी आपल्या अभिनयासाठी ओळखला जातो. त्याचे चित्रपट पाहायला थिएटर बाहेर लोक रांगा लावतात. त्याच्या चित्रपटातील डायलॉगचे तर चाहते दीवाने आहेत.

आपल्या अभिनयाच्या जोरावर शाहरुख खानने चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निमार्ण केले आहे. त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. किंग खान 'किंग ऑफ रोमान्स' या नावाने देखील ओळखला जातो. शाहरुख खान (Shah Rukh Khan) एका चित्रपटासाठी तब्बल 150 ते 250 कोटी रुपये मानधन घेतो.

मीडिया रिपोर्टनुसार, सुपरस्टार शाहरुख खानची एकूण मालमत्ता (Net Worth) 7,300 कोटी इतकी आहे. सुपरस्टार किंग खानचा बॉलिवूडच्या सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिला नंबर येतो. शाहरुख वर्षाला दोन ते तीन चित्रपट करतो आणि त्यातूनच पैसा मिळवतो. त्याच्या चित्रपटाचे प्रेक्षक दीवाने आहेत. याशिवाय तो अनेक जाहिराती करतो. तसेच त्याचे ब्रँडसोबत अनेक कनेक्शन आहेत. तसेच किंग खान आयपीएल मध्येही गुंतवणूक करतो. तसेच किंग खान अनेक ब्रँडचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर देखील आहे.

शाहरुख खानचा मुंबईत स्वतःचा मन्नत बंगला आहे. जे अंदाजे 200- 300 कोटींचे असेल. तसेच लंडन आणि दुबईमध्ये ही त्याची आलिशान प्रॉपर्टी आहे. शाहरुख खूप लग्जरी आयुष्य आपल्या कुटुंबाला देतो. शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान यांच मिळून रेड चिलीज एंटरटेनमेंट आहे. ज्यातून त्यांना भरपूर पैसा मिळतो. तसेच शाहरुख कोलकाता नाइट रायडर्सचा मालक देखील आहे. तसेच या व्यतिरिक्त त्यांनी अनेक व्यवसायात गुंतवणूक केली आहे. किंग खान गाड्यांसाठी दिवाना आहे. त्याच्याकडे अनेक लग्झरी गाड्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, किंगकडे रोल्स-रॉइस फँटम ड्रॉपहेड कूप, BMW 7-सीरीज, रेंज रोव्हर स्पोर्ट,टोयोटा लँड क्रूझर या आणि अशा अधिक गाड्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT