Shah Rukh Khan Upcoming Jawan Look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan Movie Collection : काय सांगता ! शाहरुख खानच्या 'जवान'ची प्रदर्शनाआधीच कोट्यवधींची कमाई

Jawan Collection : शाहरुखच्या या बिग बजेट चित्रपटाने प्रदर्शनाआधीच कोट्यवधींची कमाई केली आहे.

Pooja Dange

Jawan Pre-Released Collection : शाहरुख खानला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. शाहरुखचा 'जवान' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची खूप चर्चा देखील होत आहे. शाहरुखचे चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुखच्या या बिग बजेट चित्रपटाने प्रदर्शनाआधीच कोट्यवधींची कमाई केली आहे.

पठाननंतर आता शाहरुखचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यााधीच चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. अॅटली कुमार दिग्दर्शित जवान चित्रपटात शाहरुख खान अॅक्शन हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुखच्या या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Latest Entertainment News)

मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या गाण्यांचे हक्क विकून प्रदर्शनाआधीच ३६ कोटींची कमाई केली आहे. रिपोर्टनुसार काही कंपन्यांनी चित्रपटाच्या गाण्यांचे हक्क विकत घेण्यासाठी बोली लावली होती. परंतु या सगळ्यातून टी-सीरीज ही कंपनी बाहेर पडली असल्याचे बोलले जात आहे.

शाहरुख खान हा नेहमी ट्वीटरवरुन चाहत्यांशी संवाद साधत असतो. मध्यंतरी त्याने Ask SRK सेशनदरम्यान चित्रपटाबद्दल माहिती दिली होती. चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुख खान म्हणाला की, मी आणि दिग्दर्शक अॅटली कुमारचा एकत्र पहिला चित्रपट आहे.

चित्रपटावर काही काम करणे अजून बाकी आहे. याचदरम्यान 'जवान' हा चित्रपट 'डंकी'पेक्षाही आव्हानात्मक असल्याचे शाहरुख खानने सांगितले. 'जवान' चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकांमध्ये दिसणार असल्याचे सांगितले आहे.

किंग खानच्या जवान चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार नयनतारा आणि विजय सेतुपति झळकणार आहेत. शाहरुखसोबत सान्या मल्होत्रा आणि सुनील ग्रोव्हरही या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. जवानमध्ये दिपीका पदुकोनही कैमिओ करणार आहे. शाहरुखच्या 'पठान'नंतर आता 'जवान'साठी प्रेक्षक आतुर आहेत. यानंतर शाहरुखचा 'डंकी' हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Railway: ट्रेनमधून कार कोकणात न्यायचीय? कसं कराल बुकिंग, किती लागेल शुल्क? जाणून घ्या सर्व काही

Income Tax Return: करदात्यांसाठी आनंदाची बातमी! आता आयटीआरचा परतावा काही तासांत येणार

Maharashtra Live News Update: - बदलापूर रेल्वे स्थानकात बसवले जुनेच सरकते जिने

Pink E- Rickshaw Scheme: पिंक रिक्षा योजना काय आहे? कोणाला मिळते ही रिक्षा

Ghashiram Kotwal: 'घाशीराम कोतवाल' हिंदी रंगभूमीवर; ज्येष्ठ हिंदी अभिनेते संजय मिश्रा झळकणार मुख्य भूमिकेत

SCROLL FOR NEXT