Shah Rukh Khan is currently busy shooting for his upcoming film Dunki Saam Tv
मनोरंजन बातम्या

VIDEO: 'डंकी'च्या सेटवरचा किंग खानचा व्हिडिओ झाला लीक; काय तो लूक, सगळंच 'जबरा' वाटतंय

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान सध्या त्याचा आगामी चित्रपट 'डंकी'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्याच्या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान(Shahrukh Khan) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'डंकी' (Dunki)च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्याच्या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. शाहरुख हा अभिनेत्री तापसी पन्नूसोबत(Taapsee Pannu) चित्रपटाचं शूटिंग करत आहे. याच चित्रपटाच्या सेटवरून एक व्हिडिओ लीक झाला आहे. किंग खान लांब केसातील लूकमध्ये दिसतोय. तो रस्त्यावरून कारकडे धावताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाहरुख खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. व्हिडिओतील त्याचा लूक पाहून त्याचे चाहते कमालीचे एक्साइट झाले आहेत. व्हिडिओमध्ये तो जीन्स आणि लाल रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे. यासोबतच तो रस्त्यावरून आपल्या कारकडे धावताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो त्याच्या चित्रपटाच्या क्रूने वेढलेला दिसत आहे. मोठी छत्री धरलेला एक माणूस त्याच्या मागे धावतोय. पण अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी या व्हिडिओमध्ये कुठेही दिसत नाहीत.

सोशल मीडियावरील व्हिडिओबाबत असा दावा केला जात आहे की, किंग खान लंडनच्या रस्त्यावर शूटिंग संपवून आपल्या कारकडे जात आहे. त्याचा सीन संपल्यानंतर हा व्हिडिओ लपून बनवण्यात आला होता. याआधी चित्रपटाच्या सेटवरून शाहरुख खानचा आणखी एक व्हिडिओ आऊट झाला होता. ज्यामध्ये तो चेक शर्टमध्ये आहे आणि पुढील सीन कधी असणार याची वाट बघत होता.

शाहरुख खान त्याची सह-अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानीसोबत लंडन आणि युरोपमध्ये 'डंकी' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. माहितीनुसार, लंडनमध्ये काही दिवस शूटिंग केल्यानंतर तो पुन्हा युरोपला रवाना होणार आहे आणि त्यानंतर तो भारतात परतणार आहे. परदेशात शूटिंग केल्यानंतर तो उत्तर भारतात शूट करणार असल्याचेही सांगण्यात आले होते. तो पंजाबच्या बाहेरील भागात मोटरसायकलवरून एका पंजाबी गाण्याचे शूटिंग करणार आहे. एकूणच या चित्रपटातील एक खास पंजाबी गाणे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

किंग खानच्या 'डंकी' या चित्रपटानंतर तो 'पठाण' आणि 'जवान' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. शाहरुख खान बॅक टू बॅक चित्रपटांचे शूटिंग करत आहे. 'डंकी' हा चित्रपट राजकुमार हिरानी दिग्दर्शित करत आहेत. माहितीनुसार, चित्रपटाची कथा एका पंजाबी मुलाची आहे, जो अचानक कॅनडाला पोहोचतो. हा चित्रपट बॉर्डर इमिग्रेशनच्या मुद्द्यावर आधारित असल्याचेही सांगितले जात आहे. २२ डिसेंबर २०२३ रोजी 'डंकी' हा चित्रपट रीलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले

SCROLL FOR NEXT