Shah Rukh Khan Meeting His Fans Saam TV
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan Viral Video: झुमे जो पठान... शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज, अचानक बाल्कनीमध्ये आला अन्...

चाहत्यांकडून आणि प्रेक्षकांकडून मिळत असलेले प्रेम आणि प्रतिसाद पाहून शाहरुखच्या आनंदाला पारावार उरला नाही.

Pooja Dange

Shah Rukh Khan Surprise His Fans: शाहरुख खानचा 'पठान' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शाहरुखचे फॅन्स त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहेत. शाहरुखच्या काही फॅन्सनी 'पठान' पाहण्यासाठी अख्खे चित्रपटगृह बुक केले तर काही चित्रपटाचे पोस्टर गाडीवर लावले आहे.

'पठान' चित्रपटादरम्यान चित्रपटगृहांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. नाचून, फटाके फोडून शाहरुखचा चित्रपट एखाद्या सणासारखा साजरा करत आहेत.

'पठान'मुळे बॉलिवूडला पुन्हा सुगीची दिवस आले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 'पठान'ने अवघ्या 4 दिवसांत 429 कोटींची कमाई केली आहे. चाहते आणि सेलिब्रिटी 'पठान' चित्रपटाचे आणि शाहरुखचे भरभरून कौतुक करत आहेत.

किंग खान तब्बल 4 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर परतला आहे. चाहत्यांकडून आणि प्रेक्षकांकडून मिळत असलेले प्रेम आणि प्रतिसाद पाहून शाहरुखच्या आनंदाला पारावार उरला नाही. शाहरुखने सर्वांचे विशेष आभार मानले.

शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याजवळ चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. शाहरुख खान सर्व चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी अचानक मन्नतच्या बाल्कनीत आला. शाहरुखला पाहताच चाहत्यांनी जल्लोष सुरू केला आणि प्रत्येकजण फोटो क्लिक करू लागला. शाहरुखने अनेकदा सर्व चाहत्यांसमोर हात जडून त्यांना अभिवादन केले आणि त्यांच्या अफाट प्रेमाबद्दल आभार मानले.

इतकंच नाही तर शाहरुख खानने चाहत्यांसाठी 'झूम जो पठाण' या गाण्यावरील काही डान्स स्टेप्सही केल्या. शाहरुखने बाल्कनीत डान्स सुरू करताच चाहत्यांनी एकच जल्लोष सुरू केला. शाहरुख खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, शाहरुखने चाहत्यांसह ट्विटरवर आस्क एसआरकेचे एक सेशन देखील केले. यामध्ये शाहरुखने चाहते आणि यूजर्सच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.

जेव्हा एका युजरने शाहरुखला विचारले की तू 'पठान'चे प्रमोशन का करत नाहीस, तेव्हा शाहरुखने उत्तर दिले की, शेर इंटरव्ह्यू घेत नाहीत, त्यामुळे त्यानेही मुलाखत दिली नाही. एका यूजरला 'पठान'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती तेव्हा शाहरुख म्हणाला, 'भाई नंबर तो फोन के होते है. आम्ही आनंद मोजतो.'

'पठान' चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित झाला होता. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 कोटींची कमाई केली होती आणि आता 4 दिवसांत देशभरात आणि जगभरात 429 कोटींची कमाई केली आहे. 'बाहुबली 2' आणि 'KGF 2'ला मागे टाकत 'पठान' हा ओपनिंग दिवशीच हिट ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT