Shah Rukh Khan On Pahalgam terror attack Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: अमानवी कृत्य...; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शाहरुख खानने व्यक्त केला संताप

Shah Rukh Khan On Pahalgam terror attack: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननेही या घटनेवर आपली तीव्र प्रतिक्रिया दिली

Shruti Vilas Kadam

Shah Rukh Khan On Pahalgam terror attack: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचे आणि जवानांचे प्राण गेले असून, देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननेही या घटनेवर आपली तीव्र प्रतिक्रिया दिली असून, हल्ल्याला "अमानवी हिंसाचाराचा भ्याड प्रकार" असे संबोधले आहे. त्याने सोशल मीडिया अकाउंटवरून हल्ल्याचा निषेध करत शहिदांच्या कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला आहे.

शाहरुख खानने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “पहलगाममध्ये झालेला हल्ला अतिशय वेदनादायक आणि संतापजनक आहे. हे एक अमानवी कृत्य असून अशा हिंसाचाराला कोणतीही जागा समाजात असू नये. माझे मन ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले, त्यांच्यासोबत आहे. एक राष्ट्र म्हणून आपण एकजूटीने, मजबूतपणे उभे राहू आणि या घृणास्पद कृत्याविरुद्ध न्याय मिळवू. त्याने हल्ल्यात शहिद झालेल्या जवानाप्रती कृतज्ञताही व्यक्त केली आणि त्याच्या बलिदानाचा सन्मान करण्याचे आवाहन केले.

शाहरुख खानच्या या प्रतिक्रियेचे त्याचे चाहत्यांकडून समर्थन केले जात आहे. अनेकांनी त्यांच्या संवेदनशीलतेचं कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर युजर्स म्हणत आहेत की, देशातील प्रमुख कलाकारांनी अशा संवेदनशील प्रसंगांवर आपली भूमिका मांडणे गरजेचे आहे. त्यांच्या वक्तव्यातून राष्ट्राभिमान आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना दिसून येते, आणखी एकाने लिहीले अशावेळी शाहरुख खान सारख्या मोठ्या अभिनेत्याने त्याची संवेदना व्यक्त करणे म्हणजे देशाला प्रधान्य देण्यासारखे आहे.

देशभरात या घटनेनंतर कडक कारवाईची मागणी होत असून, सर्व स्तरातून एकजूट दाखवली जात आहे. बॉलिवूडमधील इतर कलाकारांनीही या हल्ल्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शाहरुख खान यांच्या प्रतिक्रियेमुळे सामान्य लोकांच्या भावनांना आधार मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT