बॉलिवूडच्या किंग खानचा आज ५८ वा वाढदिवस. किंग खानच्या फॅन्सची क्रेझ फक्त भारतातच नाही तर, जगभरात पाहायला मिळते. नेहमीच आपल्या खास अंदाजातील अभिनयामुळे आणि स्टाईलमुळे चर्चेत राहणारा किंग खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे बराच चर्चेत आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, शाहरुख ते किंग खान हा प्रवास कसा होता?
शाहरुख खानचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होण्याआधीच त्यांची प्रचंड चर्चा होत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'जवान' चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा गाठत १० चित्रपटांचा विक्रम मोडित काढला होता.
शाहरुखचे आज जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. मात्र, एक काळ असा होता तेव्हा किंग खानने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड मेहनत घेत बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. शाहरुखने 'फौजी' या सिरीयलच्या माध्यमातून अभिनयात करिअरला सुरुवात केली.
इंडस्ट्रीमध्ये नाव कमावल्यानंतर, त्याला पुढे प्रसिद्धी आणि चांगलं कामही मिळत गेलं. १९९३ मध्ये शाहरुखने जे काही काम केले ते कोणालाही अपेक्षित नव्हतं. १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या डर आणि बाजीगर या दोन्ही चित्रपटात त्याने निगेटिव्ह भूमिका साकारली होती. त्या चित्रपटामुळे शाहरुखच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली होती.
शाहरुखने आपल्या फिल्मी कारकिर्दित अनेक हिट चित्रपट दिले. शाहरुखने आपल्या फिल्मी कारकिर्दीत ६० हून अधिक चित्रपट दिले. यापैकी १५ हून अधिक चित्रपटांना बंपर ओपनिंग मिळाली होती. शाहरुखच्या नावावर सर्वाधिक कमाईचा विक्रमही आहे. शाहरुखच्या कारकिर्दीत असे १० चित्रपट आहेत ज्यांनी सर्वाधिक कमाई करत त्याला किंग खान बनवले. ९० दशकामधील अनेक असे चित्रपट आहेत, ज्यांनी किंग खानला एक वेगळी प्रसिद्धी दिली.
शाहरुख २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'झिरो' या चित्रपटातून तो अखेरचा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तब्बल पाच वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर 'पठान' चित्रपटातून किंग खानने रुपेरी पडद्यावर दमदार एन्ट्री मारली. २०२३ हे वर्ष खरंतर किंग खान साठीच नाही तर, त्याच्या चाहत्यांसाठीही खास ठरलं होतं.
शाहरुखचे २०२३ ला शाहरुखचे तीन चित्रपट चाहत्यांना पाहायला मिळाले. 'पठान' आणि 'जवान'ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत शाहरुखच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे रोवले. येत्या २२ डिसेंबरला शाहरुखचा 'डंकी' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहरुखच्या वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.