ShahRukh Khan and Gauri Khan Viral Video  SaamTv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh- Gauri Fighting: किंग खान गौरीत उडाले वादाचे खटके, शाहरुख म्हणतो, 'किती शॉपिंग करते माझे पैसे...'

'पठान'नंतर चर्चेत असलेल्या किंग खानचा आणि गौरी खानचा सध्या एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Shah Rukh And Gauri Khan Fighting Viral Video: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. सध्या 'पठान'च्या जबरदस्त कमाईमुळे ट्रेंडमध्ये असलेल्या किंग खानचा एक मजेदार व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा जुना व्हिडिओ असून यामध्ये तो त्याची पत्नी गौरी खानसोबत फोनवर भांडताना दिसत आहे. तुम्हाला जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही कारण शाहरुख इथे बायकोशी वाद घालतोय हे नक्की, पण ते फार गंभीर नाही. दोघांची ही धमाल मस्ती आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख खान गौरीसोबत तिच्या झोपण्याच्या पद्धतीवरून फोनवर भांडताना दिसत आहे. किंग खानसोबत त्याचा मित्र करण जोहरही उपस्थित आहे. दोघांमधील भांडण मिटवण्याऐवजी करण त्याला आणखी प्रोत्साहन करत आहे. पत्नी गौरी खानशी फोनवर बोलत असताना शाहरुख खान म्हणतो, "यार गौरी, तू ही गोष्ट सोडुन देना. आयुष्यात तुझ्या साठीच ते उत्तम असेल."

तर पुढे शाहरुख म्हणतो, "तू मला इतक्या वर्षांपासून ओळखतेस, तरीही तू मला आजही झोपेवरुन बोलतेस. तू आराम कर मी 44 वर्षांचा आहे. मी हे सर्व माझ्या पद्धतीने हाताळू शकतो. त्यानंतर पुढे करण शाहरुखला म्हणतो की, गौरी तुझी सर्व खोट्या काळजी करत आहे. माझी आर्थिक परिस्थिती खूप खराब कमी आहे, त्यामुळे तू खरेदी कमी कर. तिला शॉपिंग कमी करायला सांग."

या सर्व बाबींवर गौरी काय कमेंट करते हे काही कळत नाही, पण ही व्हायरल होणारी व्हिडिओ फारच जुनी आहे. या दोघांचेही भांडण सर्वांनाच फार आवडते. शाहरुखच्या या मस्तीमुळे तात्पुरती तरी का होईना चाहत्यांचे मनोरंजन नक्की झाले. शाहरुख नेहमीच आपल्या परिवारासोबत खास वेळ घालवत असतो. सोबतच शाहरुखने त्याच्या 'पठान' चित्रपटाची खास स्क्रिनिंग आपल्या फॅमिलीसाठी ठेवली होती.

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, 'पठान' चित्रपटातून किंग खान तब्बल चार वर्षांनी दमदार पुन:रागमन करीत आहे. त्याचे २०१८ मधील अनेक चित्रपट सतत फ्लॉप ठरले होते. अनेक वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर शाहरुखने मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक केले आहे. लवकरच येत्या काही दिवसातच 'बाहूबली २'चा ही रेकॉर्ड मोडित काढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Festival Makeup Look: सणासुदीला खास लूक हवा असेल तर यावेळी 'हा' मेकअप लूक नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जालना रोडवर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर येणार की नाही? समोर आली मोठी अपडेट

Dussehra 2025: दसऱ्याला आवर्जून करा ही ३ कामे, पैशांची तंगी होईल कायमची दूर

Scheduled Caste : अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण केलं नाही, तर...; फडणवीस सरकारला कुणी दिला मोठा इशारा?

SCROLL FOR NEXT