Shabana Aazami And Javed Akhtar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Javed Akhtar Birthday: शबाना आझमींनी दिला उत्कृष्ट नात्यांचा कानमंत्र...

बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमीने पती जावेद अख्तर सोबतचे सुखी वैवाहिक जीवनाबद्दल काही रहस्य उघड केले आहे.

Chetan Bodke

Javed Akhtar Birthday: बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमीने पती जावेद अख्तर सोबतचे सुखी वैवाहिक जीवनाबद्दल काही रहस्य उघड केले आहे. कोणत्याही विषयावर आमच्यात जेव्हा वाद होतो तेव्हा त्या विषयावर मार्ग निघत नाही तो पर्यंत आम्ही चर्चा करतो. शबानाच्या मते, कोणत्याही नात्यात साथीदाराला नातं टिकवण्यासाठी स्पेस मिळायला हवा.

शबाना आझमी यांच्या मते, लग्नातूनच आपले नातेसंबंध सर्वाधिक घट्ट राहते. पण तरीही आपल्याला त्यावर काम करावे लागतेच. विशेष म्हणजे शबाना आणि जावेद यांनी एकमेकांसोबत प्रेमविवाह केला होता. शबाना आझमी एका मुलाखतीत सांगितात, मला हे विचित्र वाटते की मित्र आणि सहकाऱ्यांसोबत कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न करतो, पण आपल्या लाईफ पार्टनरसोबत प्रयत्न करत नाही असं का? कारण आपण एकमेकांना कमी लेखतो आणि एकमेकांच्या नात्यातील ही विचार कधीच करत नाही.

शबाना आझमी यांनीही प्रेमाविषयी आपले मत मांडले. जोडीदाराची कोणत्या कारणामुळे मान खाली जाईल असे कृत्य करण्याऐवजी त्याचा आदर कसा राखता येईल याचा विचार करायला हवा. त्यामुळे आम्ही दोघेही एकमेकांकडून कोणत्याच गोष्टीची अपेक्षा करत नाही. म्हणून आम्ही दोघेही आमच्या आवडीच्या गोष्टी करतो.

शबाना आझमीने जावेद यांच्यासोबत कशा प्रकारे वादावर तोडगा काढतात यावर भाष्य केले. यावर शबाना म्हणतात, जावेद आणि मी अनेकदा एकाच गोष्टीवर काम केले आहे. ज्या गोष्टीवर भांडण होत असेल ती गोष्ट आम्ही सोडून देतो.

त्यावर जास्त वाद घालत नाहीत. अनेकदा हा सल्ला आम्ही एकमेकांना देतो. राग आणि उतावळेपणा तुम्हाला अयोग्य गोष्टी बोलण्यास प्रवृत्त करू शकते, ज्याचा आपल्याला पश्चाताप होईल.

शबाना आणि जावेदने 1984 मध्ये लग्न केले. ते मुंबईत एकत्र राहतात. शबानापूर्वी जावेद अख्तरचे लग्न हनी इराणीशी झाले होते. लग्नानंतर जावेद शबाना आझमीच्या प्रेमात पडले होते.

काही काळानंतर जावेद यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन शबानाशी लग्न केले. जावेद अख्तर यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. त्यांचे नाव फरहान अख्तर आणि मुलीचे नाव झोया अख्तर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT