Pathaan: शाहरुख खान अभिनित 'पठान' चित्रपटाची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. १० जानेवारीला चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सर्वत्र बोलबाला सुरू झाला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याची ओटीटीवरील चर्चांना सुरुवात झाली. हा सिनेमा येत्या २५ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. न्यायालयाने चित्रपटात काही बदल सुचवले आहेत.
अद्याप चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार याची माहिती मिळाली नाही. दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने शाहरुख खान आणि दीपिका पदुकोनच्या चित्रपटात आणखी काही बदल करण्यासाठी सुचवले आहे. दृष्टिहीन प्रेक्षकांनाही चित्रपटाचा आनंद घेता यावा यासाठी न्यायालयाने चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाबाबत काही सूचना दिल्या आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने 'पठान'च्या ओटीटी प्रदर्शनासाठी हिंदी भाषेत काही बदल सुचविले आहेत.
सुचवलेले सर्व बदल केल्यानंतर उच्च न्याालयाने निर्मात्यांना चित्रपट पुन्हा एकदा सीबीएफसीसमोर सादर करण्याचे आदेश दिले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने यशराज फिल्म्सला काही नवीन मार्गदर्शक तत्वे सुचवले आहेत. पण ती तत्व चित्रपटाला थिएटर प्रदर्शनासाठी नसून ओटीटी प्रदर्शनासाठी आहेत. न्यायालयाने प्रोडक्शन हाऊसला ओटीटीसाठी काही नवीन गोष्टी ॲड करण्यासाठी सांगितल्या आहेत.
चित्रपट निर्मात्यांना न्यायालयाने दिलेल्या सूचनेप्रमाणे ओटीटी प्रदर्शनासाठी बदल करणे आवश्यक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या 'पठान' चित्रपटाच्या ओटीटी रिलीजपूर्वी हिंदी भाषेत ऑडिओ वर्णन, क्लोज कॅप्शनिंग आणि उप-शीर्षके तयार करण्यास सांगितले आहेत. त्यामुळे पठाणसमोरील आव्हाने आणखीनच वाढली आहेत.
'पठान' एप्रिल २०२३ मध्ये ओटीटी वर प्रदर्शित होण्याची शक्यता असल्याने, न्यायालयाने दिलेले सर्व बदल यशराज फिल्म्सला करणे शक्य आहे. निर्मात्यांना आणि प्रोडक्शन हाऊसला रिलीजपूर्वी आणि नंतर आणखी अडचणींचा सामना करण्याची शक्यता आहे.
प्रदर्शनापूर्वीच चर्चेत असलेला 'पठान' चित्रपट येत्या 25 जानेवारीला हिंदी, तमिळ, तेलुगू भाषेत थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोन, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडियादेखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. निर्मात्यांनी टीझर रिलीज केल्यापासून पठान चर्चेत आला होता. दरम्यान काही लोकांनी 'बेशरम रंग' गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकिनीवरही आक्षेप घेतला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.