Shabana Azmi On Chandu Champion Film : 'चित्रपट पाहताना मला रडू आवरलं नाही'; 'चंदू चॅम्पियन' बघितल्यानंतर शबाना आझमी काय म्हणाली?
Shabana Azmi On Chandu Champion Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shabana Azmi On Chandu Champion Film : 'चित्रपट पाहताना मला रडू आवरलं नाही'; 'चंदू चॅम्पियन' बघितल्यानंतर शबाना आझमी काय म्हणाली?

Chetan Bodke

अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असलेल्या 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या तीन दिवसांतच दमदार कमाई केली असून समीक्षकांसह प्रेक्षकांकडून चित्रपटाचं कौतुक होत आहे. अनेक सेलिब्रिटीही कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाचं कौतुक करीत आहेत. नुकतंच बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी कपल ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

रविवारी रात्री गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी 'चंदू चॅम्पियन' चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. शबाना आझमी म्हणाल्या, "खूप उत्तम चित्रपट आहे. चित्रपटाचे कथानक दमदार आहे. इंटरव्हलनंतरचा भाग दमदार झालेला आहे. चित्रपट पाहताना माझी रडून रडून खूप वाईट अवस्था झाली आहे. कार्तिक आर्यनने चित्रपटामध्ये दमदार अभिनय केलेला आहे. कबीरने चित्रपटाचं दिग्दर्शन खूप दमदार पद्धतीने केले आहे."

त्यांच्यासोबत ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनीही चित्रपटाचे कौतुक केले आहे. शबाना आझमी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी या चित्रपटात प्रेरणादायी कथा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. शबाना आझमी पुढे म्हणाल्या की, "निर्मात्यांनी 'चंदू चॅम्पियन' बनवून इंडस्ट्रीवर उपकार केले आहेत. अनेक वर्षांपासून कागदांच्या ढिगाऱ्यात गाडलेली एक अद्भुत गोष्ट कबीर यांनी सांगितली आहे. ‘चंदु चॅम्पियन’ चित्रपटाचे कथानक पॅरालिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांच्यावर आधारित आहे. चित्रपटाने देशात तीन दिवसांत २२ कोटींची कमाई केलेली आहे. तर जगभरामध्ये २६ ते २७ कोटींच्या आसपासची कमाई केलेली आहे.

‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाची कथा सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. पेटकर यांनी १९७० साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये आणि त्यानंतर १९७२ साली जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशाचं नाव उज्वल केलं होतं. चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करीत असून चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांनी केली आहे. चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत भुवन अरोरा, राजपाल यादव, यशपाल शर्मा, विजय राज, अनिरुद्ध दवे, पलक लालवानी आणि इतर कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Rate: राज्यात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरातील भाव काय?

UP Hathras: हाथरसच्या चेंगराचेंगरीत 120 जणांचा बळी; सत्संगातील चेंगराचेंगरीला जबाबदार कोण?

Maratha Reservation: 'माझ्या लेकराला अन् समाजाला आरक्षण द्या', भावनिक चिठ्ठी लिहित मराठा तरुणाने संपवलं आयुष्य

Maharashtra Politics: विधानपरिषदेसाठी NCPची हायव्होल्टेज बैठक; मलिकांच्या एंट्रीनं महायुतीची कोंडी?

Rahul Gandhi News: राहुल गांधींचा दावा खोटा! पंजाबमधील कुटुंबाला पोहोचली ९८ लाखांची मदत; लष्कराची माहिती

SCROLL FOR NEXT