'पाहिले न मी तुला' या सिरीयल मधील अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन Saam Tv
मनोरंजन बातम्या

'पाहिले न मी तुला' या सिरीयल मधील अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन

झी मराठी वाहिनीवर पाहिले न मी तुला या सिरीयल मधील अभिनेत्री तन्वी मुंडळे हिचे वडील प्रकाश मुंडळे यांचे निधन झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : झी मराठी वाहिनीवर पाहिले न मी तुला pahile na mi tila या सिरीयल मधील अभिनेत्री तन्वी मुंडळे tanvi mundale हिचे वडील प्रकाश मुंडळे यांचे निधन झाले आहे. सोशल मीडियावर तन्वीने वडिलांकरिता भावनिक पोस्ट केली आहे. तन्वी मुंडळेने इन्स्टावर वडिलांबरोबरचा फोटो शेअर करत सांगितले आहे की, तुम्ही माझ्या आयुष्यामधील सगळ्यात जवळचा मित्र आहेस आणि हे माझे भाग्य आहे, की मी तुमची मुलगी आहे.

हे देखील पहा-

खूप प्रेम आबु see you whenever my time comes” असे म्हणत आपल्या बाबांच्या आठवणीत ती भावनिक पोस्ट लिहिली आहे. तन्वी मुंडळे हि तिच्या बाबांशी असणारे नाते किती मैत्रीपूर्ण होते. हे तिच्या पोस्टवरूनच समजत आहे. माझी वेळ येईल, तेव्हा आपण नक्की भेटू अशी भावना तिने आपल्या बाबांप्रति व्यक्त केली आहे. तिच्या या पोस्टवर सिरीयल मधल्या तिच्या सह कलाकारांनी तिच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन तिच्याकरिता सहानुभूती व्यक्त केली आहे.

तन्वी मुंडळे ही मूळची सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुडाळची आहे. कुडाळ या ठिकाणी तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते. कुडाळ या ठिकाणी बाबा वर्दम थिएटर्स ग्रुप तिने जॉईन केला आणि इथूनच अभिनयाची ओढ तिला लागली होती. पुढे पुण्यात ललित कला केंद्र मधून अभिनयाचे धडे गिरवले आहेत. अनेक एकांकिका, नाट्यस्पर्धांमध्ये सहभाग दर्शवून तिने आपल्या अभिनयाची छाप मोठ्या प्रमाणात पाडली.

यामधून “Colorफुल” हा तिचा पदार्पणातील पहिला मराठी चित्रपट ठरला. मात्र, अजूनही हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात ती सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर याच्याबरोबर काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात काम केल्यावर महेश कोठारे यांनी तन्वीला आपल्या मालिकेत नायिकेच्या भूमिकेसाठी निवडले होते. मात्र, प्रेक्षकांच्या अल्पशा प्रतिसादामुळे आणि कथानक दमदार नसल्यामुळे ही मालिका आटोपती घेण्यावर भर देण्यात आला होता. मात्र, मालिकेतील तन्वीची भूमिका प्रेक्षकांना आवडूही लागली आणि तिच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुकही केले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

Nanded: साखरझोपेत आभाळ फाटलं; ६ गावांना पुराचा वेढा, ४०-५० म्हशींचा मृत्यू, थराराक VIDEO

Balasaheb Thorat : काही शक्तींकडून संगमनेरची संस्कृती बिघडवण्याचे काम; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

TET Exam Result: महत्त्वाची बातमी! आज टीईटी परीक्षेचा निकाल| VIDEO

इंग्लडचं मैदान गाजवलं, पण आशिया कपमधून गिलला मिळणार डच्चू? अजित आगरकरांच्या मनात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT