Bollywood Movie Trolled In VFX : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या घोषणेनंतर प्रत्येकालाच चित्रपटाच्या कथेबद्दल उत्सुकता होती. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाने प्रेक्षकांचा बऱ्याच प्रमाणात हिर मोड केला होता. चित्रपटात रावण आणि हनुमानाच्या लूकला बराच विरोध झाल्यानंतर चित्रपटावर रामायणाचे इस्लामीकरण केल्याचा मोठा आरोप लावण्यात आला होता.
चित्रपटाला सर्वाधिक विरोध सहन करावा लागला तो, व्हिएफएक्स मध्ये. नेटकऱ्यांनी टीझर प्रदर्शित होताच टीझरमधील व्हिएफएक्सवर ट्रोलधाडी सुरु झाली. आता याच आधारावर आणखी एक चित्रपट ट्रोलर्सच्या निशाण्यावर येत आहे. त्या चित्रपटाचे नाव 'हनुमान'. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा टीझर पाहून नेटकऱ्यांनी 'आदिपुरुष' चित्रपटाला ट्रोल केले आहे.
नुकताच दाक्षिणात्य चित्रपट 'हनुमान' चा टीझर प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये अभिनेता तेजा सज्जा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. टीझरच्या सुरुवातीला प्राचीन काळापासून आतापर्यंतची कथा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासोबतच टीझरमध्ये भरपूर व्हीएफएक्स पाहायला मिळत आहे. जे पाहिल्यानंतर चित्रपटाचे खूप कौतुक केले जात आहे पण पुन्हा एकदा प्रभास स्टारर 'आदिपुरुष' चित्रपटावर ट्रोलिंग सुरू झाली आहे.
'हनुमान' चित्रपट बनवण्यासाठी 12 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे, हे निर्मात्यांनी सांगितले. परंतु सर्व युजर्सचे म्हणणे आहे की, अनेक बिग बजेट चित्रपटांपेक्षा त्याचे व्हीएफएक्स चांगले दिसते. तसेच, आता त्याची तुलना ' आदिपुरुष ' च्या व्हिएफएक्ससोबत केली जात आहे . जे काम 'आदिपुरुष'चे निर्माते 600 कोटींमध्ये करू शकले नाहीत, ते काम हनुमान चित्रपटाच्या निर्मात्यांनी अवघ्या 12 कोटींमध्ये करुन दाखवले आहे , असे अनेक यूजर्सचे मत आहे.
काही सोशल मीडिया युजर्स म्हणतात की 'हनुमान' चित्रपटाचे व्हिएफएक्स 'आदिपुरुष' पेक्षा कित्येक पटीने बरे आहे. या सर्व कमेंट्ससोबतच 'आदिपुरुष' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केले आहे. त्याचबरोबर अनेक मीम्स बनवत शेअर केले जात आहे. प्रशांत वर्मा दिग्दर्शित 'हनुमान ' चित्रपट 18 डिसेंबर रोजी तेलुगू , हिंदी , तमिळ , मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे .
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.