Birthday Special Instagram @ruutu.131 @sayali_sanjeev_official
मनोरंजन बातम्या

Sayali Sanjeev: ऋतुराजच्या वाढदिवशी सायली संजीवने कापला केक, सोशल मीडियावर पुन्हा चर्चांना उधाण

सायलीने दिल्या ऋतुराज गायकवाडला वाढदिवसाच्या भुभेच्छा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sayali Sanjeev-Ruturaj Gaikwad Birthday: भारतीय संघाचा फलंदाज ऋतुराज गायकवाड याचा आज २६व वाढदिवस आहे. मात्र ऋतुराजच्या वाढदिवशी चर्चा होत आहे ती अभिनेत्री सायली संजीव हिने केलेल्या सेलिब्रेशनची. सायलीने तिचा केकसोबतच एक फोटो शेअर केला आहे. जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

सायली संजीव आणि ऋतुराज गायकवाड यांच्या कथित अफेअरची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहे. यावर रितुराज आणि सायलीने अनेकदा भाष्य केले आहे. परंतु सायलीचा हा केकसोबतचा फोटो पाहून पुन्हा त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगी लागल्या आहेत.

ऋतुराजने सायलीच्या एका पोस्ट कमेंट केली होती. सायलीने त्याच्या कमेंटचे उत्तर अगदी काही क्षणात दिले होते. तेव्हापासून त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगू लागली. परंतु या चर्चांचा परिणाम त्याच्या नात्यावर झाला असा खुलासा सायलीने काही दिवसांपूर्वी केला.

सायली ने म्हटले की, आम्ही खूप चांगले मित्र होतो. परंतु आमच्याविषयी ज्या चर्चा होऊ लागल्या त्यामुळे आमच्यात दुरावा आला आहे. आम्ही आता मित्रांसारखे बोलू शकत नाही. माझं आणि त्याचं नाव जोडलं जात आहे हे मला माहित देखील नव्हतं.

आमच्या वयात यानंतर आहे, यावर देखील लोक चर्चा करत होते. मी २९ वर्षाची आहे आणि ऋतुराज २५ (जुने वय) आहे. आम्ही आधी बोलायचो पण आता आम्ही बोलणं बंद केलं आहे. आता आमच्यात गप्प होत नाहीत, असे सायलीने सांगितले होते.

सायलीच्या व्हायरल होत असलेल्या फोटोविषयी बोलायचे झाले तर, ऋतुराज आणि सायली यांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. सायलीने काही वेळापूर्वी तिचा हा फोटो शेअर केला आहे. तिने तिचा बर्थडे सेलिब्रेट करतानाच फोटो शेअर केला आहे. यावेळी सायलीने तिच्या बाबांची आठवण काढत भावनिक झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election : २ आमदारासह २७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी, बिहारमध्ये वातावरण तापलं

Maharashtra Politics: नंदुरबारमध्ये भाजपची ताकद वाढणार, हिना गावित यांची आज घरवापसी

Maharashtra Live News Update: मोंथा चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट

Heart blockage: मान किंवा जबड्यामध्ये वेदना होतायत? हृदयाच्या धमन्या ब्लॉक होण्यापूर्वी पाहा कोणते 5 संकेत मिळतात

Nilesh Sable : निलेश साबळेचा नवाकोरा शो; लाडक्या वहिनींसाठी भन्नाट गिफ्ट, नावही आहे खास

SCROLL FOR NEXT