Aishwarya Narkar Dance Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aishwarya Narkar Dance: "वटाण्याचा गोल दाना..." 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतील अभिनेत्रींनी केला भन्नाट डान्स, Video होतोय व्हायरल

Satvya Mulichi Satvi Mulgi Actress: सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतील अभिनेत्रींनी डान्स केला आहे. त्यांच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Manasvi Choudhary

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि नृत्य असं काहीसं समीकरणं म्हणायला हरकत नाही.ऐश्वर्या नारकर सोशल मिडियावर नेहमीच आपल्या हटके नृत्याने सर्वांची मने जिंकतात. चित्रपट, मालिका आणि नाटक या माध्यमातून ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ऐश्वर्या नारकर आता 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतात.

सोशल मीडियावर ऐश्वर्या नारकर त्यांच्या नृत्याचे व्हिडीओ पोस्ट करत असतात. तर कधी मित्रमैत्रीणी सेटवरची धमाल चाहत्यांसोबत शेअर करतात. अशातच आता सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतील अभिनेत्रींनी डान्स केला आहे. त्यांच्या हा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ऐश्वर्या नारकर, तितिक्षा तावडे, एकता, अमृता सकपाळ अनेकदा ट्रेडिंग गाण्यावर रिल्स बनवतात. आता या अभिनेत्रीनी 'वटाण्याचा गोल दाना रजे उडू नको ठणा ठणा' या गाण्यावर डान्स केला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, या गाण्याच्या लिरिक्सवर त्यांनी हुकस्टेप्स केल्या आहेत. सोशल मीडियावर ऐश्वर्या नारकरच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सोशल मिडिया ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला ७०० हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज आले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. एकाने 'तुमच्या सारखा एन्जॉय कोण करत नसेल', 'सुपर लेडीज', तर अनेकांनी हॉर्ट इमोजीसह लाईक्स दिले आहेत.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT