Satish Kaushik Birth Anniversary  Saam TV
मनोरंजन बातम्या

Satish Kaushik's Birth Anniversary: सर्वांना हसवणाऱ्या सतीश कौशिक यांच्या जीवनातील कहाणी ऐकून तुमचेही डोळे पाणावतील

Satish Kaushik's Emotional Story: 13 एप्रिल 1956 रोजी हरियाणातील महेंद्रगड येथे सतीश कौशिक यांचा जन्म झाला.

Pooja Dange

Birth Anniversary Of Satish Kaushik: कधी कॅलेंडर झाले, तर कधी पप्पू पेजर. कधी मुथुस्वामी...मग काशीराम तर कधी मामा... अशी अनेक पात्र साकारणार तो हरहुन्नरी एकच होता. सर्व पात्रांमध्ये कॉमिक टायमिंगची जादू दाखवून पडद्यावर येताच हा अभिनेता सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणायचा. मात्र, सगळ्यांना हसवणाऱ्या या कलाकाराच्या आयुष्यातील या वेदनेने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतील.

आम्ही बोलत आहोत अभिनेते सतीश कौशिकबद्दल, ज्यांनी काही दिवसांपूर्वी जगाचा निरोप घेतला. आज सतीश कौशिक यांच्या जयंतीनिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील एक अशी गोष्ट सांगणार आहोत ज्याने तुमचेही डोळे पाणवतील.

13 एप्रिल 1956 रोजी हरियाणाच्या महेंद्रगड येथे जन्मलेल्या सतीश कौशिक यांचे नाव इंडस्ट्रीतील उत्तम अभिनेते आणि दिग्दर्शकांमध्ये घेतले जाते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर सतीशचा नाट्यक्षेत्रात हातखंडा होता. सतीश कौशिक यांच्या आयुष्यात असा एक अपघात घडला, ज्यामुळे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना हसवाऱ्या सतीश यांचे हृदयाच जणू तुटले.

या घटनेनंतर सतीश कौशिक यांचे हास्य केवळ पडद्यापुरतेच मर्यादित राहिले. त्यांनी त्यांच्या जीवनात गुप्तता बाळगायला सुरुवात केली. खरं तर, सतीश कौशिक यांच्या जीवनातील ही कथा त्यांचा मुलगा शानूशी निगडित आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल, हा शानू कोण?

कारण सतीश कौशिक यांना वंशिका नावाची एक मुलगी आहे, इतकेच अनेकांना माहित आहे. परंतु सतीश कौशिक यांना एक मुलगा देखील होता, ज्याचा अवघ्या दोन वर्षांच्या वयात मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर सतीश कौशिक यांना मोठा धक्का बसला होता.

1990 साली सतीश कौशिक यांचा दोन वर्षांचा मुलगा शानूचे अचानक निधन झाले. मुलगा गेल्याच्या दु:खात सतीश एकटेच राहू लागले. आयुष्यातील या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी सतीश कौशिक यांनी कधी स्वत:ला बंद केले तर कधी कामात इतकं गुंतवून घेतलं की विचार करण्याची संधीच त्यांनी स्वतःला दिली नाही.

मुलाच्या निधनानंतर सतीश इतके एकटे झाले की अभिनेत्यासाठी त्याची पत्नीही कुठेतरी गायब झाली होती. मात्र, तब्बल 16 वर्षांनंतर तो दिवस आला जेव्हा सतीशने जिजीवनात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि 2012 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून त्यांच्या घरी मुलगी वंशिकाचा जन्म झाला.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलीच्या जन्माची माहिती देतानाही मुलगा शानू गमावल्याची वेदना सतीश कौशिक यांच्या शब्दांत स्पष्टपणे दिसून येत होती. सतीश यांनी म्हटले होते की, 'आमच्या मुलीच्या जन्मामुळे आमच्या मुलाची दीर्घ आणि वेदनादायक प्रतीक्षा संपली आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT