Santosh Juvekar Post On Instagram  Facebook Santosh Juvekar
मनोरंजन बातम्या

Santosh Juvekar Share Post: 'मंदिर, चर्च, दर्ग्यात मला तीच सकारात्मक ऊर्जा जाणवते...', अभिनेता संतोष जुवेकरची इंस्टा पोस्ट चर्चेत

Santosh Juvekar At Mahakal Temple Ujjain: संतोष नुकताच निर्माते महेश पटेल आणि आकाश ठोसर यांच्यासह उज्जैनच्या महाकाल आणि कालभैरव मंदिरात गेला होता.

Pooja Dange

Santosh Juvekar Share Video : अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावर सक्रिय आहे. संतोष नेहमीच त्याच्या जीवनातील महत्त्वाच्या अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असतो. तसेच तो सोशल मीडियावर त्याच्या भूमिका मांडत असतो. संतोषने त्याच्या सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे.

संतोष नुकताच निर्माते महेश पटेल आणि आकाश ठोसर यांच्यासह उज्जैनच्या महाकाल आणि कालभैरव मंदिरात गेला होता. या मंदिरांना त्याने फक्त भेट दिली असे नाही तर तिथे पूजा आणि अभिषेक देखील केले. संतोषने त्याच्या अनुभव कसा होता हे सांगणारी एक पोस्ट शेअर केली आहे. (Latest Entertainment News)

संतोष जुवेकरची पोस्ट

"आमच्या महेश दादामुळे सध्या अनेक देवस्थानांच्या दर्शनांच पुण्य मला मिळतय. काल पहिल्यांदा उज्जैन येथे महाकाल आणि काल भैरवनाथचे दर्शन घेतलं.

अगदी अभिषेक सुद्धा करायला मिळाला. मी अंधश्रद्धाळू अजिबात नाही पण एक वेगळीच ऊर्जा जाणवली त्याच्या गाभाऱ्यात. तशीच ऊर्जा मला अनेक मंदिरात जाणवली आहे. मी चर्चमध्ये सुद्धा जातो गोव्यात गेलो की, काही जुनी चर्च आहेत मला आवडत तेथे जायला.

मी दरग्यातही जातो. नाशिकहून ठाण्याकडे येताना घाट संपला की डाव्या बाजूला एक दर्गा आहे मी न चूकता आणि न चूकवता त्या दरग्यात जातोच जातो. त्या चर्च आणि दरग्यातही मला तीच ऊर्जा जाणवते आणि ती सकारात्मक ऊर्जा कायम आपल्या सोबत रहावी ही प्रार्थना मी कायम करतो.

पण मला आज त्या मंदिरातल्या देवाला त्या चर्च मधल्या येशूला आणि त्या दरग्यातल्या अल्ल्हाला सांगायचंय तुझ्या गाभाऱ्यात ही जी सकारात्मक ऊर्जा आहे ती संपूर्ण विश्वात भरुदे. हा सुद्धा तुझाच तर गाभारा आहे ना!" '

संतोष जुवेकरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संतोष, आकाश आणि महेश पटेल पूजा करताना दिसत आहेत. त्या तिघांनींही धोतर नेस्ले असून अंगावर पंचा घेतला आहे. संतोषच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी त्याचे कौतुक केले आहे. तर काहींनी त्याला ट्रोल केले आहे. संतोष नुकताच रावरंभा या चित्रपटामध्ये दिसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी परतूर येथे काँग्रेसच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा

Madhura Joshi: गुलाबी साडी अन् ओठावर लाली, मधुराच्या सौंदर्याची भलतीच चर्चा

Nandurbar Crime : किरकोळ वादातून भररस्त्यात चाकू हल्ला; तरुणाचा मृत्यू, नंदुरबारमध्ये तणावाचे वातावरण

Shahrukh Khan: शाहरुख खानसाठी मुलगा आर्यन झाला फोटोग्राफर; 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'च्या स्क्रीनिंगचा VIDEO व्हायरल

High Court: मराठा आरक्षणाच्या GR विरोधात याचिका, न्यायाधीशांनी दिला मोठा निर्णय, कोर्टात नेमकं काय काय झालं?

SCROLL FOR NEXT