Sanju Rathod Gulabi Sadi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gulabi Sadi: 'गुलाबी साडी'च्या तालावर थिरकले रितेश देशमुख-अजय देवगण; VIDEO तुफान व्हायरल

Sanju Rathod Gulabi Sadi: संजू राठोडच्या सुपरहिट 'गुलाबी साडी' गाण्याचे 'धमाल ४'साठी नवीन व्हर्जन प्रदर्शित होणार आहे. अजय देवगण, रितेश देशमुख आणि कलाकारांचा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shruti Vilas Kadam

Sanju Rathod Gulabi Sadi: मराठी पॉप संगीताला देशभरात नवी ओळख मिळवून देणारे संजू राठोड यांचे सुपरहिट 'गुलाबी साडी' हे गाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर कोट्यवधी व्ह्यूज आणि लाखो रिल्स मिळवणाऱ्या या गाण्याचे आता बॉलिवूडसाठी नवीन व्हर्जन तयार करण्यात आले आहे. यामध्ये अभिनेता अजय देवगण आणि रितेश देशमुख यांची भन्नाट जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. या नव्या व्हर्जनच्या गाण्याचे टीझर प्रदर्शित होताच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

'धमाल ४' या आगामी चित्रपटासाठी 'गुलाबी साडी' गाण्याला नव्या रूपात सादर करण्यात आले आहे. या नव्या व्हर्जनला 'साडी' असे नाव देण्यात आले असून, त्यात मूळ गाण्याची एनर्जी तशीच ठेवत बॉलिवूडचा तडका देण्यात आला आहे. रिलीज झालेल्या ऑडिओ ट्रॅकला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, २७ जून रोजी या गाण्याचा अधिकृत व्हिडिओ प्रदर्शित होणार आहे.

या गाण्याचे संगीत संयोजन प्रसिद्ध संगीतकार तनिष्क बागची यांनी केले आहे. तर नवीन बोल गीतकार कुमार यांनी लिहिले आहेत. त्यामुळे मूळ गाण्याची लोकप्रियता आणि नव्या व्हर्जनची मांडणी यांचा सुरेख संगम या गाण्यात पाहायला मिळणार आहे. संजू राठोड यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अजय देवगण, रितेश देशमुख, ईशा गुप्ता, अंजली आनंद आणि स्वतः संजू राठोड यांची झलक पाहायला मिळते. टीझर शेअर करत त्यांनी, "तुमचा गुलाबी रंग सोशल मीडिया फीडवर राज्य करण्यासाठी येतोय... तयार रहा!" असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टनंतर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा अक्षरशः वर्षाव केला आहे.

'गुलाबी साडी' हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर्स आणि चाहत्यांनी या गाण्यावर डान्स व्हिडिओ आणि रिल्स तयार केले होते. आता त्याच गाण्याच्या नव्या व्हर्जनमध्ये बॉलिवूड कलाकारांची एन्ट्री झाल्याने या गाण्याची लोकप्रियता आणखी वाढणार आहे. हे गाण प्रेक्षकांना कसं वाटलं ते उद्या प्रदर्शित झाल्यानंतरच समजेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हॉटेलच्या रुममधून नग्न अवस्थेत धावत सुटला तरुण; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Maharashtra News Live Update: संजय राऊतांच्या आमंत्रणाला भाजपचं प्रत्युत्तर

भाजप नेत्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; मतदारसंघात फिरताना आला हार्ट अटॅक; CCTV व्हिडिओ व्हायरल

Titwala Waterfall : धुकं, हिरवागार निसर्ग अन् खळखळणारे धबधबे, टिटवाळ्याजवळील 'हे' ठिकाण पावसाळ्यात बनते स्वर्ग

Ketan Agarwal : सिया-चेतनने गुपचूप लग्न केलं होतं? राजस्थानच्या 'त्या' मंदिरात पोलिसांच्या हाती काय लागलं?

SCROLL FOR NEXT