Sanjay Leela Bhansali's 'Heeramandi' Gets Second Season Instagram @netflix_in
मनोरंजन बातम्या

Heeramandi 2nd Season : "मेहफिल फिरसे जमेगी...", ओटीटीवर पुन्हा 'हिरामंडी' गाजणार; सीरिजच्या दुसऱ्या सीझनची घोषणा

Sanjay Leela Bhansali's 'Heeramandi' Gets Second Season : ओटीटी विश्वातील सर्वाधिक चर्चेत राहिलेली वेबसीरीज म्हणजे, 'हिरामंडी: द डायमंड बाझार'. अशातच दिग्दर्शकांनी या वेबसीरीजच्या दुसऱ्या सीझनची घोषणा केलेली आहे.

Chetan Bodke

ओटीटी विश्वातील सर्वाधिक चर्चेत राहिलेली वेबसीरीज म्हणजे, 'हिरामंडी: द डायमंड बाझार'. या वेबसीरीजमधल्या गाण्याची, वेबसीरीजच्या सेटची आणि डायलॉगची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. संजय लीला भन्साली दिग्दर्शित 'हिरामंडी: द डायमंड बाझार' ही सीरीज १ मे रोजी रिलीज नेटफ्लिक्स या ओटीटीवर झालेली आहे. अशातच आता दिग्दर्शकांनी या वेबसीरीजच्या दुसऱ्या सीझनची घोषणा केलेली आहे. पहिल्या सीझनला दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे.

या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत, सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, आदिती राव हैदरी, संजीदा शेख, रिचा चढ्ढा, शर्मीन सेगल, फरदीन खान, शेखर सुमनसह अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. काही तासांपूर्वीच नेटफ्लिक्सने या सीरीजची घोषणा केलेली आहे. पहिला सिझनची शुटिंग लाहोरमध्ये झालेली होती. आता दुसऱ्या सिझनची शुटिंग मुंबईमध्ये होणार आहे. 'हिरामंडी: द डायमंड बाझार २'ची घोषणा मुंबईच्या कार्टर रोडवर फ्लॅश मॉब करुन करण्यात आली. 'हिरामंडी: द डायमंड बाझार'मधील गाण्यांवर नृत्यांगनांनी फ्लॅश मॉब सादर केला.

यावेळी त्यांनी ट्रेडिशनल अनारकली ड्रेस वेअर करत १०० नृत्यांगणांनी फ्लॅश मॉब सादर केला होता. "मेहफिल फिरसे जमेगी, हिरामंडी सीझन २ आयेगा" असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. या सीरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये काय काय बघायला मिळणार यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'हिरामंडी: द डायमंड बाझार २'ची घोषणा ऐकल्यानंतर प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. 'हिरामंडी: द डायमंड बाझार' प्रमाणे 'हिरामंडी: द डायमंड बाझार २'मध्येही तेच सेलिब्रिटी दिसणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tapalwadi Waterfall : पावसात लांब कशाला? मुंबईतच वसलाय स्वर्गाहून सुंदर टपालवाडी धबधबा

ICC Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; सिकंदर ऑलराउंडर नंबर १, हार्दिक पंड्याचं स्थान धोक्यात

Pandharpur News: पंढरपूरात दीड लाख भाविकांची गर्दी; विठ्ठल-रूक्मिणी पदस्पर्श दर्शनासाठी सहा तासांची प्रतीक्षा|VIDEO

Maharashtra Live News Update: आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या तयारीला वेग

OBC Reservation : ठरलं! सरकारच्या 'जीआर'विरोधात कोर्टात जाणार; छगन भुजबळांकडून ओबीसी कार्यकर्त्यांना मोठं आवाहन

SCROLL FOR NEXT