Sanjay Dutt Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sanjay Dutt: संजय दत्तने मागितली महिला आयोगासमोर लेखी माफी; 'सरके चुनर' वादानंतर ५० मुलींच्या शिक्षणाचा उचलणार खर्च

Sanjay Dutt: 'केडीः द डेविल' या चित्रपटातील 'सरके चुनर तेरी सरके' या गाण्यावरून निर्माण झालेल्या वादप्रकरणी, बॉलिवूड अभिनेता संजय दत्त राष्ट्रीय महिला आयोगासमोर (NCW) हजर झाला. या गाण्यावरून मोठा गदारोळ झाल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने त्याला नोटीस बजावली होती.

Shruti Vilas Kadam

Sanjay Dutt: कन्नड ‘पॅन-इंडिया’ चित्रपट 'केडीः द डेविल' मधील ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्याच्या हिंदी व्हर्जनवरून निर्माण झालेला वाद अद्यापही शमलेला नाही. हे गाणे यूट्यूबवरून काढून टाकण्यात आले असले, तरी त्याभोवतीचा गदारोळ सुरुच आहे. गाण्यात महिलांचे अश्लील आणि अपमानकारक चित्रण केल्याच्या आरोपांनंतर राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) निर्माते आणि संबंधित कलाकारांना नोटिसा बजावल्या होत्या. यामध्ये संजय दत्त आणि नोरा फतेहीचा देखील समावेश होता.

या प्रकरणात अभिनेता संजय दत्त सोमवारी महिला आयोगासमोर हजर झाला. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत झालेल्या सुनावणीत संजय दत्तने लेखी माफीनामा सादर केला. समाजाच्या भावना दुखावल्या असल्यास खेद व्यक्त करत, सर्जनशील आशयात महिलांचे जबाबदारीने चित्रण करणे महत्वाचे होते असे त्याने माफीनामात नमुद केले.

सुनावणीदरम्यान आयोगाने जाणीव, हेतू आणि उत्तरदायित्व यांसारख्या मुद्द्यांवर कठोर प्रश्न उपस्थित केले. अशा प्रकारच्या आशयात सहभागी होण्यापूर्वी कलाकारांनी कायदेशीर आणि नैतिक पडताळणी करणे आवश्यक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

५० आदिवासी मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

या पार्श्वभूमीवर संजय दत्तने ५० आदिवासी मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे आश्वासन दिले. महिला सक्षमीकरण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत हा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले.

नोरा फतेही हिलाही आयोगाने समन्स बजावले

दरम्यान, या गाण्यात झळकलेली अभिनेत्री नोरा फतेही हिलाही आयोगाने समन्स बजावले होते. मात्र, ती सध्या देशाबाहेर असल्याने सुनावणीस हजर राहू शकली नाही. तिने पुढील तारखेसाठी आयोगाकडे विनंती केली आहे. याआधी ६ एप्रिल रोजी दिग्दर्शक, गीतकार आणि निर्मिती संस्थेचे प्रतिनिधी आयोगासमोर हजर राहून माफी मागितली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : दसऱ्याआधी सोनं स्वस्त झालं की महागले? २४, २२, १८ कॅरेटचे ताजे दर आले समोर

Surya Namaskar: १०,००० पावले, सायकलिंग किंवा जिम विसरा; 'हा' व्यायाम आहे लय भारी

Maharashtra News Live Update: अमरावती विद्यापीठात बॅटरीच्या स्फोटाने आग; तीन दुचाकी जळून खाक

Fenugreek Seeds: वजन ते शुगर कंट्रोल...; मेथीच्या दाण्यांचे हे ९ अद्भूत फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

Long Hair Care Tips For Women: केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय, मेथी आणि तांदळाचा हेअर सीरम लावा

SCROLL FOR NEXT