Sania Mirza Shoaib Malik Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sania Mirza Shoaib Malik: खरंच की काय? सानिया मिर्झा-शोएब मलिक वेगळे होणार? नेमकं काय बिनसलंय?

सानिया मिर्झा-शोएब मलिक फक्त मुलगा इजहानसाठी पालक म्हणून एकत्र येणार.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sania Mirza Shoaib Malik News: भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्ताचे क्रिकेटर शोएब मलिक यांचा २०१०मध्ये प्रेमविवाह पार पडला. या दोघांना इजहान हा चार वर्षाचा मुलगा आहे. सध्या सानिया तिच्या इंस्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आहे. सानियाच्या पोस्टवरून ती आणि शोएब विभक्त होणार असल्याचे म्हटले जात आहे.

सानियाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, 'तुटलेले ह्रदय कुठे जाते?, अल्लाला शोधण्यासाठी'. टेनिस स्टार सानियाने ही पोस्ट शेअर केल्यापासून चाहते हैराण झाले आहेत. मात्र शोएब किंवा सानिया दोघांनीही यावर कोणते स्पष्टीकरण दिलेले नाही.

पाकिस्तानातील मीडियाचे म्हणणे आहे की, मलिकने सानियाची फसवणूक केली आहे. पाकिस्तानी मीडियाने अशीही बातमी दिली आहे की, हे जोडपे वेगळे झाले आहे आणि बऱ्याच काळापासून वेगळे राहत आहे. अशा ही अफवा पसरवली जात आहे की हे जोडपे आता फक्त त्यांचा मुलगा इजहानसाठी पालक म्हणून एकत्र येणार आहेत. (Sport)

नुकताच त्यांनी त्यांचा मुलगा इजहरचा वाढदिवस साजरा केला आहे. दोघांनीही मुलाच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी सानियाने एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. सानियाने तिच्या मुलासोबतचा एक फोटो शेअर केला होता आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते की, 'हे ते क्षण आहेत जे मला सर्वात कठीण दिवसांतून जाण्यास मदत करतात.' (Social Media)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT